Home मराठवाडा धक्कादायक नांदेड मध्ये आणखी 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले जिल्ह्यात एकूण कोरोना...

धक्कादायक नांदेड मध्ये आणखी 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या २६ वर पैकी दोन मृत्यू सध्या जिल्ह्यात २४बाधित रुग्ण घेत आहेत उपचार

168

नांदेड , दि. २ ( राजेश भांगे ) – श्री गुरुद्वारा लंगर साहेब परिसरातील कार्यरत व्यक्तींचे दिनांक 30 एप्रिल 2020 व 1 में 2020 रोजी स्वाब घेण्यात येऊन तपासणी करण्यात आली होती. यापैकी 20 हे कोरोना विषाणूमुळे बाधित आढळून आले आहेत तर 25 व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तसेच 11 स्वाब हे अनिर्णित आहेत. उर्वरित अहवालाची प्रतीक्षेत आहेत. सदर व्यक्तींना एन. आर. भवन कोव्हीड केयर सेंटर येथे दाखल करण्यात आलेले आहे.
दिनांक 2 मे 2020 रोजी कोरोना विषाणू संदर्भात नांदेड जिल्हा येथे 1235 संशयितांची नोंद झालेली आहे. एकूण घेण्यात आलेल्या स्वाब पैकी. 1120 व त्यापैकी 1009 अहवाल निगेटिव आले असून 65 स्वाबचा अहवाल प्रलंबित आहेत आतापर्यंत एकूण पाच तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. तसेच 14 निष्कर्ष निघालेले नाहीत. एकूण घेण्यात आलेल्या 1120 स्वाब व त्यापैकी आज पर्यंत 6 नव्याने आलेल्या 20 रुग्णांचा स्वाब असे एकूण 26 पॉझिटिव्ह रुग्ण नांदेडमध्ये आहेत. यापैकी पीरबुऱ्हाण नगर नांदेड व परभणी जिल्ह्यातील सेलू येथील महिला रुग्णाचा औषधोपचारात प्रतिसाद न दिल्यामुळे दोन्ही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काही दिवसांपूर्वी अढळलेले आबचल नगर येथील रुग्णांचा पॉसिटीव्ह अहवाल आणि श्री गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील भाविकांना पंजाब राजापर्यंत वाह सेवा पुरवणारे 2 वाहन चालक यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीलकंठ भोसिकर यांनी माहिती दिली आहे.
मोठ्या प्रमाणात विषाणू बाधित झालेल्या गुरुद्वारा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून
त्यामुळे जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता, कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये व तसेच अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन नांदेड प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

तरी नांदेड जिल्ह्याची रेड झोनच्या दिशेने वाटचाल

नांदेडमध्ये आणखी २० पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याची माहिती
कोरोना बाधित व्यक्तींचा आकडा २४ वर
बाधित पंजाब येथून परतलेले चालक असल्याची माहिती
जिल्ह्यात २४ तासात नव्या २० रुग्णांची भर
अत्ता पर्यंतची एकुण कोरोणा बाधितांची संख्या २६ व म्रतांची संख्या २.