Home पश्चिम महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी शंभुसेना माजी सैनिक आघाडीच्या वतीने गरजूंना मदतीचा ओघ सुरूच..

राज्यात विविध ठिकाणी शंभुसेना माजी सैनिक आघाडीच्या वतीने गरजूंना मदतीचा ओघ सुरूच..

134
0

पेडगावात मदती प्रसंगी अनेकांना अश्रू अनावर…

पुणे / श्रीगोंदा – (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना शंभुसेना माजी सैनिक आघाडीच्या वतीने रोख आर्थिक मदतीसह किराणा मालाच्या किटचे वाटप केले जात आहे.

सध्या कोरोनाच्या तीव्र प्रादुर्भावाने गरीब, वयोवृद्ध , कष्टकरी, असंघटित मजूर, कामगारांच्या हाताला काम उपलब्ध नसल्याने अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे, अशा संकट समयी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शंभुसेना माजी सैनिक आघाडीने पेडगावसह राज्यात विविध ठिकाणी साधारणतः १५ दिवस पुरेल एवढ्या किराणा मालाचे किट देऊन गरजूंना दिलासा देण्याचा ओघ चालूच ठेवला आहे.
संचारबंदीने गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील अनेकांना बेरोजगारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अशा अडचणीच्या प्रसंगी शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के, माजी सैनिक आघाडीचे सुनिल काळे यांच्यासह संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी योगदान देत समाजकार्य चालू ठेवले आहे. संघटनेने योग्य वेळी.. योग्य निर्णय घेऊन १५ दिवस पुरेल एवढ्या किराणा मालाच्या किटचे गरजूंना वाटप केले आहे. किराणा किट मध्ये प्रामुख्याने गव्हाचे पीठ, भाताचे तांदूळ, साखर, खाण्याचे तेल, चहा पत्ती, मिठ पुडा, चना डाळ, मिर्ची पावडर, हळद पावडर, जिरी, मोहरी, मुंग डाळ, तूर डाळ, कपड्यांचा साबण, आंघोळीचा साबण आदी वस्तूंचा अत्यावश्यक बाबींचा समावेश आहे.
पेडगावात मदत देतेवेळी अनेकांना डोळ्यातुन येणारे अश्रू आवरता आले नाहीत.. यावेळी शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के, परशुराम खळदकर, लक्ष्मीकांत शिर्के, विष्णु (राजू) गावडे, गोरख खेडकर, भरत झिटे आदी उपस्थित होते.