Home विदर्भ दिशा दर्शक फलकावर चुकीची माहिती , “चंद्रपुर नव्हे चांदापुर”

दिशा दर्शक फलकावर चुकीची माहिती , “चंद्रपुर नव्हे चांदापुर”

141
0

देवानंद जाधव

यवतमाळ – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर, दिशा दर्शक फलकावर चुकीची माहिती देण्यात आली आहे. यवतमाळ ते आर्णी च्या मध्ये असलेल्या भांब (राजा)या गावाच्या पुर्व दिशेला “चांदापुर” हे गाव आहे. माञ राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सर्वच फलकावर “चंद्रपुर” असा ऊल्लेख केला आहे.

त्यामुळे महामार्गावरुन ये जा करणारे वाहन धारक आणि प्रवासी गोंधळून जात आहे. या शिवाय महामार्गावर अनेक ठिकाणीच्या दिशादर्शक फलकावर ईंग्रजी आणि मराठी भाषेची सरमिसळ झाल्याने बहुतांश गावांची नावे बदलली आहेत.त्यामुळे विशेषतः परप्रांतीय वाहन धारक गोंधळून जात आहे. त्यामुळे महामार्गावरील फलकावर झालेल्या अक्षम्य चुका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्वरीत दुरुस्त कराव्यात, अशी वाहन धारकांकडुन मागणी होत आहे.