Home विदर्भ समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील वृक्षलागवड कौतुकास्पद.!

समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील वृक्षलागवड कौतुकास्पद.!

66
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील समुद्रपूर वनपरिक्षेञ अंतर्गत लावण्यात आलेले रस्ता दुर्तफा व गट वृक्षलागवड संगोपण कौतुकास्पद असुन नुकतेच सदर रोपवण ग्राम पंचायत ला हस्तांतरित करण्यात आले.
सन2018-19पावसाळया मध्ये चोवीस साईट वर वृक्षलागवड करण्यात आली .समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील वृक्षसंगोपण कौतुकास्पद असुन वृक्ष उंची आठ दहा फुट असुन 90 टक्के झाडे जिवंत आहेत. तसेच सन2016-17चे पावसाळ्यात रस्ता दुर्तफा लावण्यात आलेल्या घुमनखेडा-पारोदी,वायगाव गोंड-टेकाडी, गिरगावपाटी-कोरा,खापरी,खुर्सीपार-गिरड मार्गावर कडू,पेल्टाफार्म, निंब,जांभुड,आवडा,पिंपड,शिरस,गुलमोहर, करंज अशे विविध वृक्षलागवड केली आहे सर्वे साईट वरील वृक्ष नव्वद टक्के पेक्षा अघिक झाडे जिवंत आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतंर्गत,लोकसहभागातुन लावण्यात आलेले वृक्षांचे संगोपण कर्मचारी,मजूर,स्थानिक ग्रामस्त, हरीतसेना विघ्यार्थी सहकार्या मुडे वृक्षलागवड यशस्वी झाली,वृक्षलागवड मुडे ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध झाला असुन रस्ता सौंदर्यांत भरपडली आहे.