Home विदर्भ महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने अकोट शहरात प्रशासकीय अधिकारी पोलीसांचे फुलांच्या...

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने अकोट शहरात प्रशासकीय अधिकारी पोलीसांचे फुलांच्या वर्षावाने स्वागत

95

अकोट – देवानंद खिरकर

कोरोना विषाणू चा प्रदुभाव रोखण्या साठी संपूर्ण भारतभर लॉकडाऊन करण्यात आले असून प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाय योजना केल्या जात आहे. शासन प्रशासन कोरोना नामक महामारीला हरविण्या करीता रात्रदिवस कार्य करीत आहेत त्यामुळे या संकटाशी लढन्याच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्याचा सन्मान व्हावे या माध्यमातून अकोट मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष अहेमद शेख संघटक प्रकाश आम्ले व अकोट येथील सामाजिक कार्यकत्यांनी प्रशासकीय अधिकारी व पोलीसांचे फुलांच्या वर्षावाने स्वागत केले यावेळी कदीर भाई .फिरोज खान.नासीर शहा या सामाजिक कार्यकत्यांनी पुढाकार घेत मदीना हॉल पासून अंजनगाव रोड पऱ्यंत अकोट न,पा, मुख्यधिकारी डोल्हारकर अकोट शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले गोपनीय विभागाचे ,एस.आय.रंजित खेडकर आर.सी.पी.पालटून प्रमुख चंद्रकांत सोळंके अशा सर्व व नगर पालिका महसूल पोलीस प्रशासनाच्या शासकीय प्रशासकीय कर्मचारी कर्तव्याचे प्रत्येक घरातून फुलाने सन्मान करून एक आगळा वेगळा संदेश दिला , कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेले लॉकडाउन चे सर्वांनी कर्तव्य व जबाबदारी म्हणून पाळली पाहिजे जेणेकरून कोरोना विरोधातील लढाई जिंकता येईल कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी सोशल डिस्टनसिं पाळणे महत्वाचे आहे. सर्वांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे अशे आव्हान पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष अहेमद शेख यांनी केले तसेच डॉ. इरफान,डॉ. युसूफ खान,कदीर भाई ठेकेदार, फिरोज खान ,नासीर शहा यांनी कोरोना विरोधातली लढाई जिंकण्यासाठी लोकांना सोशल डिस्टनसिं चे सुद्धा काटेकोर पने पालन करणे.मास्क तोंडाला बांधणे व घरी राहण्याचे आवाहन केले यावेळी शेख इरफान समीर मिर्झा अ.शफिक.अ.सलीम.जहिद अहेमद. अ.रहीम. शेख अनसार रियाज अली.अ.अनिस.अफजल शहा सन्मानासाठी परीश्रम घेतले.