Home मुंबई मालाड पश्चिम रातोडी व्हिलेज मधील शिधावाटप दुकानातील गैर कारभार

मालाड पश्चिम रातोडी व्हिलेज मधील शिधावाटप दुकानातील गैर कारभार

251

मुंबई – सुरेश वाघमारे

देशात कोरोना सारख्या महामारीची परिस्थिती आहे.असल्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. नागरिकांना शिधावाटप दुकानांमध्ये रेशनकार्ड धारकांना अन्न धान्य मिळावे तसेच रेशनकार्ड वरील प्रत्येकी व्यक्तीला पाच किलो तांदूळ मोफत देण्यात यावे असे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिले आहेत.

यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन बुजबळ कार्यरत आहेत. असे असताना मालाड पश्चिम, रातोडी व्हिलेज, नीलिमा को.ऑप.सोसा.मधील शिधावाटप दुकान क्र.४२ ग १९४ या दुकानात मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याची तक्रार कार्ड धारकांकडून करण्यात येत आहे. अनेक वेळा दुकान बंद ठेवण्यात येत, कार्ड धारकांना अन्नधान्य देण्यात येत नाही, दुकानाचा फलक दर्शनी भागात नाही, अन्नधान्य घेतल्यानंतर दुकानदार त्याची पावती देत नाही, कार्ड धारकांना मोफत मिळणारे तांदूळ मिळत नसल्याची तक्रार दुकानदाराच्या तक्रार वहिमध्ये काही कार्ड धारकांनी केली आहे.
लॉकडाऊन मध्ये सर्व उदयोग धंदे बंद आहेत त्यातच हातावर पोट असणाऱ्या गोर गरीब जनतेला जगणे कठीण झाल्याने सरकार कडून मिळणाऱ्या अन्नधान्यामुळे ह्या गरीब जनतेला मोठा आधार झाला आहे त्यातच काही शिधावाटप दुकानदार काळा बाजार करीत या गरीब जनतेच्या ताटातील अन्न हिसकविण्याचा लाजिरवाना प्रकार करीत आहे त्यामुळे अश्या दुकानदारावर त्वरित कारवाई करून नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या कडे ट्विटरद्वारे तक्रार करून केली आहे.
सविस्तर वृत्त असे की शिवाजी आनंदा वाघमारे हे वरिष्ठ नागरिक असून ते पिवळे कार्डधारक आहेत . यांचे नियमीत रेशन घेणे चालू असून आगस्टपर्यंत सदर दुकानदार रॉकेल देत होता मात्र आता रॉकेल भेटत नसून गहु १२किलो तांदूळ ८ किलो डाळ तुरीची १किलो यापेक्षा कुठलेही सामान देत नाही पावती माघितली तरी देत नाही मनमानी करीत असून बहुतांश शिधाधारकांना मोफत तांदूळ दिलेच नाही, रेशनकार्ड लिंक नाही त्याना म्हणून कित्तेक लाभधारक दुकानातून माघारी गेलेत. तसेच हा दुकानदार नागरिकांना उलट बोलतो” उपरसें हि नहीं आया जाओ नही मिलेगा, नही तो दुसरे दुकान मे जाओ उधर करो अपना कार्ड” असें उद्धटपणे उत्तरं देत असतो दिनांक 20/4/2020 रोजी दुकान दुपारपासून बंद केले वं बोर्ड लावला २० तारिक बाद रेशन मिलेगा. राशन खत्म हुवा है. दिवसभर लोक विनापानी दुकानासमोर दुकानदारांची वाट बघत बसले ज्याच्या शिधापत्रिके मध्ये ५ नावं असतील त्याना ४ व्यक्तींचे रेषन देऊन बोळवण करीत काळ्याबाजारात माल विकत असल्याचे समजते दुकानावर शिधावाटप दुकानचे कुठेही दर्शनी नाव नाही. किराणा खासगी दुकानाचे नाव दिसते या विभागातील गरीब भोळीभाबडी जनता या दुकानदारांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरडली जात असून कित्येक लोक उपासमार अनुभवत आहेत गेंड्याची कातडी पांघरलेल्या या दुकानदारास याचे काहीही सोयर सुतक नाही.