Home विदर्भ लखमापूर पोलिस पाटलाची हत्या की आत्महत्या.

लखमापूर पोलिस पाटलाची हत्या की आत्महत्या.

31
0

▶️ मृत्यूचे कारण गुलदस्त्यात/सर्वत्र शोककळा

कोरपना – मनोज गोरे

कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील पोलिस पाटील समाधान एकनाथ वडसकर हे शेतात मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली असून ही हत्या की आत्महत्या शवविच्छेदना नंतरच कळणार.सदर घटना 18 एप्रिल रोजी सकाळी घडली असून समाधान अत्यंत मनमिळाऊ असल्याने मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांसह मित्रमंडळींनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. समाधान यांचे वय अंदाजे 36 असून पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि वृद्ध वडील असा परिवार आहे.सदर घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृत्युचे नेमके कारण अद्यापही कळले नाही.शवविच्छेदनासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.

Unlimited Reseller Hosting