Home विदर्भ चिमुकल्या निहाल व महेक ने एक महीन्याचा उपवास (रोजा) ठेवुन एक वेळच्या...

चिमुकल्या निहाल व महेक ने एक महीन्याचा उपवास (रोजा) ठेवुन एक वेळच्या जेवणाचे पैसे सिएम व पिएम रिलिफ फंडात केली मदत

56
0

कोरपना – मनोज गोरे

कोरोना महामारीच्या रुपाने देशावर मोठे संकट कोसळले आहे. या संकटाचा सामना शासन व प्रशासनातील सर्व घटक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांवर उपचार करण्याठी कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. अशा कठीण प्रसंगी देशाला आर्थीक मदतीची गरज असून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुध्दा राज्यातील नागरीकांना सीएम रिलीफ फंडात तर देशाचे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी पिएम रिलीफ फडांत आपले योगदान देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूर जिल्ह्यातील बिबी येथील मुस्लिम समाजातील मुल निहाल वय 6 वर्ष व महेक वय 12 वर्ष या बहीण भावाने विचार केला. की आपण आपल्या देशासाठी हातभार लावुया. रमजान महीन्यात जसे 30 दिवासाचे उपवास ठेवतो त्याप्रमाणे ज्या दिवशी पासुन लाँकडाऊन झाले आहे तेव्हापासून लाँकडाऊन संपेपर्यंत एक वेळचा उपवास ठेवुन एका वेळच्या जेवणाला दोघाला लागणारे खर्च 30 रूपये प्रमाणे एका महीन्याचे 1000 रूपये सिएम व पिएम रिलीफ फंडात जमा करून एक आदर्श निर्माण केला आहे.

निहाल व महेक हे दोघा बहीण भाऊ रोज सकाळी उठुन उपवास (रोजा) ठेवतात काही वेळ टिव्हीवर बातम्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे लक्ष देवुन टिव्ही बघतात, तर काही वेळ कुरान पठण,चेस खेळणे तर आँनलाईन शाळेचा अभ्यास घरीच बसुन कम्प्युटर करत आहे. पुर्ण वेळ लाँकडाऊन मुळे प्रधानमंत्री च्या स्टे टु होम च्या आव्हानाला सहकार्य आम्हाला घरीच राहून करता आले असे सांगितले. या विषयी परिसरातील नागरिकांना माहिती होताच या चिमुकल्या बहिण भावाना फोनवरून कौतुक केले आहे.