Home विदर्भ साखरवाही येथिल इसमाचा भेडाळा रोडवर संशयास्पद मृत्यू

साखरवाही येथिल इसमाचा भेडाळा रोडवर संशयास्पद मृत्यू

59
0

कोरपना मनोज गोरे

राजुरा तालुक्यातील साखरवाही येथील बाळू सोनिराम लोखंडे वय 38 वर्ष याचा भेडाळा बेरडी या रोडवर संशयास्पद मृत्यूदेह आढळल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

पोलिसांच्या मिळालेल्या माहितीनुसार मृतक हा काल कामाला जात असल्याचे सांगून घरून सायकल घेऊन निघून आला मात्र रात्री घरी न आल्याने आज शोधाशोध केली असता भेंडाळा बेरडी रोडवर तो पडून असल्याचे आढळले तेंव्हा विरुर पोलिसांना याची माहिती दिली असता विरूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार तिवारी ,नारगेवर मेजर यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह राजुरा येथे पाठविण्यात आले
घटनेचं गांभीर्य पाहता त्याचा मृत्यू हा विषारी दारूमुळे किंवा विषबाधा मुळे झल्याची चर्चा होत आहे.