Home विदर्भ आरोग्य यंत्रणेतील 3917 कोरोना योध्दांना 50 लाखाच्या विम्याचे कवच , “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...

आरोग्य यंत्रणेतील 3917 कोरोना योध्दांना 50 लाखाच्या विम्याचे कवच , “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाय”

157

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

अनुचित प्रकार घडल्यास मिळणार ५० लाखांची मदत…आशांना अतिरिक्त 1000 मानधन….

वर्धा , दि. १८ :- कोरोना या विषाणूजन्य आजाराने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. सुदैवाने वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र प्रशासनाकडून अनेक प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. याचाच भाग म्हणून कोरोना योद्धा म्हणून आरोग्य यंत्रणेतील सर्व डॉक्टर, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका अशा एकुण 3900 योध्दांना विम्याचे कवच देण्यात आले आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कार्य करीत असलेल्या या योध्दांना शासनाने दिलास दिला आहे.
कोरोना बाधित जिल्ह्यांसह राज्यातून वर्धा जिल्ह्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीवर गाव पातळीवर काम करणाºया अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका लक्ष ठेऊन त्यांची माहिती गोळा करीत आहेत. सोबतच होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शक सूचना देण्याचे कामही जिल्ह्यातील आशा व अंगणवाडी सेविका करीत आहेत. कोरोनापासून वर्धा जिल्हा सुरक्षित रहावा म्हणून वर्धा जिल्ह्यातील पोलीस, महसूल व आरोग्य विभागातील अधिका-यांसह कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत. या कामात अंगणवडी सेविका आणि आशा स्वयंसेविकांचेही महत्वाची भूमिका आहे. त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्याची जबाबदारी शासनाने उचलली असून त्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून जिल्ह्यातील १ हजार 150 आशा स्वयंसेविका आणि १ हजार २६७ अंगणवाडी सेविकांना ५० लाखांच्या विम्याचे कवच देण्यात आले आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील कोणत्याही कर्मचा-यासोबत अनुचित प्रकार घडल्यास त्यांना 50 लाख रुपये देण्यात येईल.
यासोबतच डॉक्टर, आरोग्य सहाय्यक , परिचारिका, वार्डबॉय अशा 1500 आरोग्य कर्मचा-यांना सुध्दा 50 लाखाचे विमा कवच दिले आहे.
आशांना मिळणार १ हजार अतिरिक्त मानधन
वर्धा जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. शिवाय प्रतिबंधात्मक उपाय जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. कोरोना योद्धा म्हणून सध्या जिल्ह्यातील १ हजार ७५ आशा स्वयंसेविका सेवा देत आहेत. या आशा स्वयंसेविकांना अतिरिक्त मानधन म्हणून १ हजार रुपये देण्यात येणार आहेत.