Home जळगाव निर्मल सिडस्‌ प्रा. लि. पाचोरा या कंपनीकडून “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” ला रुपये...

निर्मल सिडस्‌ प्रा. लि. पाचोरा या कंपनीकडून “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” ला रुपये १८ लाख व प्रधानमंत्री सहाय्यता निधी” १५ लाख रुपयांची मदत

71
0

निखिल मोर

पाचोरा – कोविड – १९ (कोरोना) या विषाणुने संपुर्ण जगभरात थैमान घातले असुन संपुर्ण मानवजात आज प्रंचड दहशतीखाली आहे. या वैश्विक संकटाला तोंड देण्यासाठी भारत देशसुध्दा सज्ज होऊन जीवाची बाजी लावत आहे. परंतु देशातील वाढणारा कोविड – १९ या कोरोना विषाणु ग्रस्तांचा आकडा अतिशय चिंताजनक असुन भारतात अनेक बिकट सामाजिक आणि आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत. देशात कोविड -१९ कोरोना विषाणू या साथरोगाचा संसर्ग टाळण्यासाठी, त्याचा प्रसार थांबविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून युध्द पातळीवर विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अशा या वैश्विक संकटाच्या काळात शासन व प्रशासनाला पुर्णपणे सहकार्य करणे अतिशय गरजेचे आहे.
निर्मल सिडस्‌ प्रा. लि. पाचोरा या कंपनीतील सर्व अधिकारी व कर्मचारी हे कोविड १९ कोरोना विषाणुच्या युध्दात शासन व प्रशासन यांना सहकार्य करण्यासाठी आर्थिक बळ घेऊन समोर आले आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व माननीय प्रधानमंत्री महोदयांनी मदतीसाठी केलेल्या आवाहानास विनम्रपणे प्रतिसाद देऊन स्वइच्छेने “मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड १९” साठी रुपये १८ लाख रुपयांची व प्रधानमंत्री सहाय्यता निधी” कोविड १९” साठी १५ लाख रुपयांची मदत
केली असुन उपरोक्त रक्कम माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली “मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड १९” व प्रधानमंत्री सहाय्यता निधी” कोविड १९”
या खात्यात दि. १६ एप्रिल रोजी जमा करण्यात आली आहे.
आपण सर्वांनी शासन व प्रशासनाच्या सुचनांचा आदर करुन सोशल डिस्टंसिंग पाळुन सहकार्य करावे असे विनम्र आवाहन आम्ही निर्मल सिडस्‌च्या माध्यमातुन सर्व जनतेला करीत आहोत. असे आवाहन निर्मल सिड्सचे महाव्यवस्थापक सुरेश पाटील यांनी केले आहे.

Unlimited Reseller Hosting