Home विदर्भ जग हादरले मात्र सिंदी रेल्वे करांना भाजीपाल्याचीच पडली चिंता

जग हादरले मात्र सिंदी रेल्वे करांना भाजीपाल्याचीच पडली चिंता

56
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

दररोज गुजरी भरुन सुध्दा गुरुवारी झाली अलोट गर्दी…

वर्धा – कोरोनाची दररोज वाढणारी रुग्ण संख्येने जगाला हादरुन सोडले….देशच्या देश… शहरच्या शहर.. गावच्या गाव बंदीस्त झाली….. मात्र सिंदी रेल्वे करांना भाजीपाल्याचीच पडली चिंता.
प्रशासनाने कोरोनाला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडी बाजार मागील एक महिण्यापासुन बंद केला. परिणामतः शहरातील झेंडा चौकातील दैनंदिन गुजरीत गर्दी वाढल्याने ही पीपरा रोड चौकात भरविली मात्र येथे ही गर्दी होत असल्याने प्रशासनाने लागलीच दखल घेत दररोज नेहरु विद्यालयाच्या मैदानावर भाजीपाला गुजरी भरवने सुरु केले दररोज गुजरी भरुन सुध्दा आज गुरुवारी (ता.१६) येथे सुध्दा असंख्य भाजीपाला दुकानदारानी दुकाने थाटली आणि पाहता-पाहता लोकांनी खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. ऐवढे वर्षापासूनची सिंदीकरांची आदत काही सुटेना, कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराने जगाला थांबवले… जगाचे दररोज अरबो रुपयाचे नुकसान होत आहे तरी शासन सरकार एकएक जीव वाचविण्यासाठी धडपड करतया असंख्य डाॅक्टर नर्स सफाई कामगार पोलीस आपल्या सुरक्षेसाठी जीवाचे रान करीत आहे आपला जीव धोक्यात घालून परीवार वार्यावर सोडुन रात्र दिवस राबत आहे…… प्रशासन कधी नव्हे ऐवढे सहनशील व्होवून जमेल तशी जमेल ती मदत देशाच्या काण्याकोपर्यात पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहेत… प्रशासनच नाही तर अनेक स्वयंसेवी संस्था सेवाकार्य करणार्‍या अनेक देवदूताचे हाथ या कामी राबत आहे.

कशासाठी की या भयानक संकटातुन महामारीतुन आपण सुखरुप बाहेर पडुया इतर देशाप्रमाने आपल्या देशात सुध्दा लाशाचा ढीग लागु नये यासाठी…. मात्र सिंदीकरांना याचे काहीही सोयरेसुतक नाही त्यांना चिंता आहे ती भाजीपाला खरेदीचीच.