Home विदर्भ दिव्यांगांना घरपोच धान्य पुरवठा करावा – जिल्हाधिकारी

दिव्यांगांना घरपोच धान्य पुरवठा करावा – जिल्हाधिकारी

152

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १७ :- कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत हालचाल न करु शकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तुचे घरपोच वाटप करण्याबाबतच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. रास्तभाव दुकानदार, तलाठी,ग्रामसेवक यांनी आपल्या गावातील दिव्यांग व्यक्तीच्या घरी घरपोच धान्य पुरवठा करावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

दिव्यांग व्यक्तीच्या परिवारात दुसरे कुणीही नाही अश्या दिव्यांग व्यक्तीना प्राध्यान्याने घरपोच धान्य पुरवठा करण्यात यावा. तसचे दिव्यांग व्यक्तीच्या परिवारातील इतर व्यक्ती दुकानात आल्यास त्यांना प्राधान्याने तात्काळ रास्तभाव दुकानदाराने धान्य पुरवठा करावा. याबाबत तहसिलदारानी रोज आढावा घ्यावा. असे जिल्हाधिकारी यांनी सागितले आहे.

जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी दिव्यांगासाठी समन्वय समिती गठीत केलेली आहे. दिव्यांगाच्या संदर्भात कुठल्याही तक्रारी किंवा अडचणी असल्यास समिती मधील नोडल अधिकारी श्रीमती एस.एस.शिंदे भ्र.क्र.9075000423 व के. एस. थुल, सदस्य-8329884973 याच्याशी संपर्क साधावा. तसेच हेल्पलाईन क्र. 07152-240102, 240533 व किशोर सोनटक्के आपत्ती व्यवस्थापन अधिकारी भ्रमणध्वनी क्र. 9970730850, 07152-243446 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बांसे यांनी केले आहे.