Home जळगाव निंभोरा येथे माजी विद्यार्थायांनी 27 वर्षानी फुलवला मैत्रीचा मळा विद्येच्या प्रांगणात स्नेहाचा...

निंभोरा येथे माजी विद्यार्थायांनी 27 वर्षानी फुलवला मैत्रीचा मळा विद्येच्या प्रांगणात स्नेहाचा लळा ,

351

*1992/93 सालातील बँच मित्रांनी कोरोनाच्या भितीला झुगारत एकत्र येत घडवला गेट टुगेदर कार्यक्रम*
रावेर (शरीफ शेख) रावेर तालुक्यातील
निंभोरा येथिल न्यु इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा घेण्यात आला . सर्व प्रथम मान्यवर शिक्षक,विद्यार्थीयांनी सरस्वती देवीची माल्याअर्पण व पुजा करत . आपल्या गुरुजनांचा शाल श्रिफळ व गुलाब पुष्प देत सत्कार केला.गावातील विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थानी या मेळाव्यात सहभाग घेवुन बालपणीच्या आठवणीना उजाळा दिला.व आपल्या मनातील सुप्त व गुप्त शालेय मित्र व मैत्रीणीनी निर्मळ मैत्रीची त्या आठवणीनां भावना विभोर होत वाट मोकळी करुन दिली.
अध्यक्षस्थानी माजी मुख्यध्यापक फेगडे सर ,व विद्यमान मुख्यध्यापक पी के चौधरी, अे.एन चौधरी, ऐ एच वारके , साहेबराव चौधरी,व चेअरमन प्रल्हाद भाऊ बोंडे व सरपंच डिगंबर चौधरी,प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक प्रदिप शिरनाथ व सुनिल बोरसे यांनी केले.याच बरोबर न आलेल्या मित्रांची खंत व्यक्त केली .व दिवंगत गुरुजन व मित्रांना श्रधाजंली अर्पण केली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार दुर्गादास पाटील व दिनेश पाटील यांनी केले.
या प्रसंगी सर्व मित्रांनी आपले मनोगत व्यक्त कले व परीचय दिला.कोण कुठे व काय करतो हे आवर्जुन सांगीतले.आणी शाळेच्या विधायक कामासाठी काही करण्याचा मानस व्यक्त केला.मुबई,पुणे, नाशिक,जळगाव ,भुसावळ,तसेच विविध राज्यात व देशात नोकरी निमित्त स्थायिक झाले तरी या स्नेहमेळाव्यास सपत्नीक एकत्र जमले.व आपल्या कुटुबांतील मुलांचा पण सहभाग नोंदवला.
शिक्षकांनी आम्हास घडविले व प्रेरणा दिली व नावलौकीक मिळवुन दिला . त्यामुळेच आम्ही डाँक्टर,इंजिनिअर,उद्योजक,पपत्रकार,राजकारणी,व्यवसायिक,व गृहणी, प्रगतीशील शेतकरी घडलो. कार्यक्रमानंतर स्नेह भोजनात सर्वानी भरीत पुरी ,कढी,शिरा,पापड,जलेबी आदी पक्वानांचा आस्वाद घेतला.

*यांनी घेतला सहभाग दिनेश पाटील, दुर्गादास पाटील, प्रमोद चौधरी,योगेश कोळंबे,गजानन पाटील, दस्तगीर खाटीक,दिलीप चौधरी, हेमराज महाजन,वजीर पटेल,गुणवंत भंगाऴे,प्रदिप शिरनाथ,कैलास बोरोले,राहुल जावळे,परीक्षीत पंडीत,धिरज लोहार,सुनिल बोरसे,विलास मगर,डाँ महेंन्द्रा भालेराव, ईश्वर तायडे, ,विनोद महाजन, कैलास भागवत, पंकज चौधरी ,दिपक कोळी,हिरालाल पाटील,किरण इंगळे,विजय कोऴी,लिलाधर गुरव,खेमचंद बोरनारे,संतोष गायकवाड ,गणेश फाळके,व तसेच संजीवनी पवार,वैशाली पाटील, मिनाक्षी भिरुड, साधना खडसे,सुनिता भंगाळे,सरला खाचणे,विजया चौधरी,सुवर्णा धांडे,संगीता शेलोडे,वैशाली चौधरी, संगीता खाचणे,आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
*कार्यक्रम यशस्वी ते साठी .ईश्वर कोळी,अमोल चौधरी,सुपडु फेगडे व शिक्षकवृन्द तसेच सचिव शालेय व्यवस्थापन समिती यांनी परीश्रम घेतले.