Home मराठवाडा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे संचालक दिपक भिंगारदेव यांचे मौलाना आझाद कॉलेज येथे...

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे संचालक दिपक भिंगारदेव यांचे मौलाना आझाद कॉलेज येथे स्वागत.

101

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

औरंगाबाद , दि. २५ :- आज दिनांक २५ जानेवारी २०२०. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे संचालक दिपक भिंगारदेव यांनी नुकतेच मौलाना आझाद कॉलेज चे प्राचार्य डॉ. मझहर फारुकी यांची भेट घेतली. डॉ. मझहर फारुकी यांनी मौलाना आझाद ट्रस्ट चे संस्थापक भारताचे जेष्ठ राजकारणी, महान शिक्षणतज्ज्ञ, तत्वज्ञानी, इस्लामिक विद्वान डॉ. रफिक झकेरिया लिखित पुस्तक ‘मोहम्मद आणि कुराण’ भेट देऊन दिपक भिंगारदेव यांचे कॉलेज मध्ये स्वागत केले. श्री. दिपक भिंगारदेव व डॉ. मझहर फारुकी यांच्या मध्ये ‘विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकास’ या विषयावर सखोल चर्चा झाली. लवकरच मौलाना आझाद कॉलेज व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मध्ये सामंजस्य करार (Memorandum of Understanding) होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. १० वी, १२ वी, डिप्लोमा व पदवी नंतर करण्यात येणारे उद्योग, उद्योग धंदे सुरु करण्यासाठी शासनाची विविध योजना, शासकीय अनुदान (सबसिडी) इतर विषयांवर तज्ज्ञ लोक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून सदर उपक्रमाने विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे डॉ. मझहर फारुकी यांनी सांगितले. या प्रसंगी मराठवाडा कॉलेज ऑफ एजुकेशन चे सहायक प्राध्यापक सोहेल झकीऊद्दीन व अब्दुल रहीम यांची उपस्थिती होती.