Home विदर्भ भावानेच केला भावाचा खून…!!

भावानेच केला भावाचा खून…!!

53
0

अमीन शाह

वर्धा , दि. २५ :- तालुक्यातील धानोली गावात काल भरदुपारी भावानेच भावाचा खून करण्याची घटना घडली. यात दीपक पांडुरंग सायवानकर याचा त्याचा भाऊ विश्वास सायवानकरने लोखंडी रॉड दीपकच्या डोक्यावर मारून खून केला होता. पण त्यापूर्वी दीपक सायवानकरने त्याच्या मरणास कारण ठरलेला लोखंडी रॉड तो त्याच्या आईला मारत असताना त्याच्या हातातून विश्वासने हिसकावून घेत दीपकच्या डोक्यावर मारला. हा घटनाक्रम याबाबतची पोलिसांत दिेलेल्या तक्रारीतून मृत दीपकचा भाऊ विजय सायवानकर यांनीच उघड केला.

पांडुरंग सायवानकर यांना चार मुले. त्यापैकी विजय ( वय ४९ ) कुटुंबासह काटोल येथे पॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो. सर्वात मोठा भाऊ छिंदवाडा जिल्ह्यातील मोहगाव हवेली येथे राहातो. तिसरा भाऊ विश्वास आणि मृत दीपक हे आई बेबीबाई सायवानकर ( वय ६५ ) यांच्यासोबत धानोलीत राहायचे. ते घरीच लोहारकाम करायचे. आई बेबीबाईने मुलाला सांगितल्यानुसार दीपक हा घरगुती कारणातून आईसोबत वाद करीत होता. तोे आईला लोखंडी पाईपने मारत असतानाच मोठा भाऊ विश्वासने तो हिसकावून दीपकच्या डोक्यावर मारल्याने दीपक जागीच कोसळला आणि मरण पावला.आई बेबीबाई मुलाच्या खुनाचा घटनाक्रम अपरिहार्यपणे पाहात होती. नंतर भावानेच भावाविरुद्ध कारंजा पोलिसात खुनाची तक्रार दिली.