Home जळगाव साखळी उपोषणाचा ३१ वा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून मतदारांसाठी प्रतिज्ञा करून...

साखळी उपोषणाचा ३१ वा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून मतदारांसाठी प्रतिज्ञा करून निषेध

24
0

शरीफ शेख

रावेर , दि. २६ :- जळगाव मुस्लिम मंच मार्फत जिल्हाअधिकारी कार्यालयाबाहेर भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा शनिवार हा एकतीस वा दिवस उपोषणआर्थीनी हा राष्ट्रीय मतदार दिवस असल्याने मतदारांसाठी प्रतिज्ञा घेऊन भाजप सरकारला विरोध दर्शविला.

३१ वा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या लाक्षणिक उपोषणात ३० व्या दिवशी २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला वास्तविक पाहता हा दिवस २५ जानेवारी रोजी होता परंतु २५ जानेवारीला चौथ्या शनिवाराची सुट्टी असल्याने शासनाच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसापूर्वी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला परंतु जळगाव मुस्लिम मंच यांच्या निदर्शनास सदर बाब आल्याने त्यांनी आज भारत सरकारच्या विरोधात उपोषण सुरू असले तरी लोकशाही बळकट करण्यासाठी मुस्लिम मंच चे समन्वयक फारुक शेख यांनी उपस्थितांकडून प्रतिज्ञा करून घेतली.
प्रतिज्ञा – आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरा चे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पवित्र राखू व व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म ,वंश ,जात, समाज ,भाषा, यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदान करू अशी शपथ सर्व उपोषणार्थीनी घेतली.
ही प्रतिज्ञा गफ्फार मलिक, डॉक्टर अमानुल्ला शाह, शेख हसन, बशीर बुर्‍हानी, शरीफ शाह, पत्रकार सईद पाटिल,मुश्ताक़ करीमी,अकील ब्यावली, सचिन धांडे,मुकुंद सपकाले,कासिम उमर ,रौफ खान, डॉक्टर जबी,डॉ एजाज शाह, डॉक्टर जावेद, मुफ़्ती अतिक, मस्ती हारून, ताहेर शेख, तय्यब शेख ,युसुफ शाह, फारूक अहेलेकार, शाहिद सैयद,खलील पठाण, अजमल खान, डॉक्टर रिजवान खाटीक, अस्मा शेख, जहूर शेख, शिरीन जफर शाह, शाहीन वसीम शाह, हिना कौसर, तबस्सुम शाहिद, आशा अंभोरे ,मनीषा बागुल, ममता तडवी, अय्यूब वकील,अनवर सिकलीगर, आदी उपस्थित होते
शाह परिवार ,अंजुमन खिदमत खल्क व जाणीव बहुउद्देशीय संस्था यांचा सक्रिय सहभाग

मनीषा बागुल , संजय मराठे , प्रवीण पाटील, पुष्पा मुलमुले, प्रिया महाजन, पायल चौधरी, हरीश मुलमुले, हिराबाई बडगुजर, अल्ताफ शेख ,कासिम उमर, हाफिज रहीम, मुफ़्ती हारून, खलील पठाण ,प्रोफेसर जाकिर, डॉक्टर अमानुल्ला, नगमा मुफ़्ती अफजल, गफ्फार मलिक ,आशा अंबुरे, युसुफ शाह, तबरेज शेख, मजिद झकेरिया ,शरीफ शाह व मनीषा बागुल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.