Home विदर्भ उध्दवजींचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करणार तर कोरोना संकटामुळे यवतमाळ जिल्हा शिवसेनेचा...

उध्दवजींचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करणार तर कोरोना संकटामुळे यवतमाळ जिल्हा शिवसेनेचा निर्णय

204

प्रतिनिधी यवतमाळ

शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाला यवतमाळ जिल्हयातील शिवसैनिक शेतक-यांच्या बांधावर जाणार आहे. कोरोना संकटामुळे उध्दवजींचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याच्या सुचना जिल्हयाचे पालकमंत्री व वन मंत्री संजय राठोड यांनी दिले आहे. त्यामुळे गरजु शेतक-यांच्या शेतात फवारणीसह विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी दिली आहे.

उध्दवजी ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस आहे. संपुर्ण महाराष्ट्रात उध्दवजींचा वाढदिवस शिवसैनिक उत्साहाने साजरा करतात. यावर्षी मात्र राज्यावर कोरोनाचे संकट असल्यामुळे सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याच्या सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या. यासंदर्भात यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री संजय राठोड व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड तसेच विश्वास नांदेकर यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने 27 जुलै 2020 रोजी असणाऱ्या पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वाढदिवसाचे कार्यक्रम घेण्याबाबत चर्चा झाली. कोरोना संकटामुळे वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे ठरले. अद्ययावत फवारणी यंत्राद्वारे दिनांक 20 ते 27 जुलै पर्यंत गरजू शेतकऱ्यांना शिवसेना शेतात फवारणी करून देणार आहे. गरजू व गरीब शेतकरी ज्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे त्यांनी शिवसेनेच्या तालुका प्रमुखांकडे नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम यवतमाळ जिल्हयातील सर्व 16 तालुक्यात राबविण्यात येणार आहे.त्याकरिता शिवसेनेतर्फे 16 फवारणी यंत्र जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गत 25 वर्षांपासून सुरू असलेला कुपोषण विरुद्धचा लढा ह्या वर्षी देखील सुरूच राहणार आहे. कुपोषित बालकांना व मातांना दूध पावडर, प्रोटीनेक्स व सकस आहार वाटप जिल्ह्यात सर्वच तालुक्यात करण्यात येणार आहे. कोरोना मुळे एकत्र येणे शक्य नसल्याने ह्या वर्षी कुपोषित बालकांच्या मातांना घरपोच सकस आहार वाटप शिवसेनेतर्फे करण्यात येणार आहे.

नागरीकांचे स्क्रिनींग करणार

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहना नुसार यवतमाळ जिल्ह्यातील शहरे व ग्रामीण भागात शिवसेनेतर्फे पल्स ऑक्सिमिटर व थर्मल गन चे माध्यमातून नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.संशयित नागरिकांचा अहवाल शासकीय यंत्रणांना सोपवण्यात येईल. जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 1 लक्ष नागरिकांचे स्क्रिनिंग करण्याचे लक्ष शिवसेनेने समोर ठेवले आहे. ह्या उपक्रमाची जबाबदारी शिवसेना तालुका प्रमुखांना व शहर प्रमुखांना देण्यात येणार आहे. हा उपक्रम 20 जुलै ते 30 जुलै 2020 पर्यंत सुरू राहील.