Home महत्वाची बातमी मनसे धावली कोरोना योध्दांसाठी… महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आरोग्य विभागाला १००० पीपीई...

मनसे धावली कोरोना योध्दांसाठी… महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आरोग्य विभागाला १००० पीपीई किट डॉक्टर्स, नर्सेस आणि स्वच्छता कर्मचारी यांना देण्यात येणार .

289

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण आणि आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न या सर्व पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा मनसे तर्फे खारीचा वाटा म्हणून डॉक्टर्स, सिस्टर्स आणि स्वछता कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा करीत आहे.

या सर्व कोरोना योद्धासाठी मनसेच्या वतीने १००० पीपीई किट आज मनसेचे राज्य उपाध्यक्ष आनंद एेेबंडवार ,जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या हस्ते आज जिल्हाशल्य चिकिस्तक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना त्यांच्या कार्यालयात पीपीई किट देण्यात आल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या योगदानाचे आरोग्य विभागाने कौतुक केले असून आज डॉक्टर्स आणि कोरोना कर्मचार्यांना पीपीई किट ची खरी गरज असून कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास पीपीई किट मुळे बचाव होऊ शकतो. या सोबतच यवतमाळ जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या आशा , रुग्ण सेवक, पोलीस कर्मचारी आणि जिल्ह्यातील प्रमुख कार्यालयात काम करणाऱ्या स्वछता कर्मचार्यांना मनसे तर्फे पीपीई किट चे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी दिली. समाजातील सर्व स्तरातून मनसेच्या या पुढाकाराचे स्वागत करण्यात येत असून आज मनसेने संपूर्ण लॉक डाउन काळात मास्क, सॅनेटायझर वाटप, हँड वॉश वाटप केले .तसेच शेकडो कुटुंबांना धान्याची किट वाटप, शहरातील छोट्या वस्त्यात निर्जंतुकीकरण, संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी बियाणे वाटप यासह अनेक समाजउपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले हे विशेष. मनसेच्या या पीपीई वाटप प्रसंगी प्रामुख्याने आनंद एेेबंडवार, देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, संजय अंबलकर, विकास पवार,अमित बदनोरे, फारुख तमन्ना ,प्रथमेश शिवरामवार, पिंटू पिंपळकर यासह इतर कार्यकर्ते आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.