July 16, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

अपघातास निमंत्रण देणाऱ्या अर्धवट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करा- भूमिपुत्र संघर्ष वाहिनीची मागणी…

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – वर्धा-पिपरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रायजा टाउन मधील ४० मिटर अर्धवट रस्त्याचे काम अपूर्ण होते त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले , ही बाब लक्षात येताच भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे अभिजीत कुत्तरमारे यानी दखल घेत हे उर्वरित काम त्वरित करण्यात यावे,व होणाऱ्या अपघातास प्रतिबंध घालावा याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात भूमिपुत्र संघर्ष वाहिनी मार्फ़त निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांना दि, 29 सोमवारला निवेदन देण्यात आले. ही मागणी पूर्ण न झाल्यास सर्व रहिवाश्यांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे. या प्रसंगी गजानन बाजारे , सुमित डेकाटे, महेंद्र मेश्राम, प्रशिक कांबळे आदींची उपस्थित होती.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!