रायगड

चक्रीवादळात माणगावमधील मृत व्यक्तींच्या वारसांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

Advertisements
Advertisements

गिरीश भोपी

अलिबाग – दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले.


चक्रीवादळात माणगाव तालुक्यातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदतीचे धनादेश आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, नगराध्यक्ष योगिता चव्हाण, नगरसेवक आनंद यादव, रत्नाकर उभारे, संदीप खरगंटे, संगिता बक्कम, प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, मुख्याधिकारी श्री.राहुल इंगळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
चक्रीवादळात मृत पावलेले उणेगाव येथील कै.ललित नथुराम सत्वे यांचे वारस निकिता सत्वे, निशा सत्वे, नथुराम सत्वे, स्नेहा सत्वे, निकेश सत्वे यांना प्रत्येकी वीस हजार रुपये रक्कमेचे धनादेश यावेळी देण्यात आले. यापूर्वी शासनाच्या सुधारीत निकषानुसार यांना प्रत्येकी ऐंशी हजार रुपये रक्कमेचे धनादेश देण्यात आले होते.
तसेच बाटेचीवाडी येथील मृत व्यक्ती कै.सचिन सुरेश काते यांचे वारसदार श्री.सुरेश काते यांना एक लाख रुपये रकमेचा धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते देण्यात आला.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
रायगड

रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदी जयसिंग मेहेत्रे रुजू

गिरिश भोपी –  रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा कार्यभार श्री.जयसिंग दत्तात्रय मेहेत्रे यांनी उपजिल्हाधिकारी सर्जेराव ...
जळगाव

त्या पीडित अल्पवयीन मुली साठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव कडे आर्थिक मदतीसाठी अर्ज सादर

रावेर (शरीफ शेख) जळगाव शहरातील तांबापुर झोपडपट्टीत राहत असलेली अल्पवयीन मुलीला धुणी भांडी घासत असताना ...
रायगड

ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचे स्व. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गिरीश भोपी अलिबाग / रायगड , दि.29  – ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी 30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख ...
रायगड

पनवेल डी.डी. विसपुते बी.एड.महाविद्यालयात “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस उत्साहात संपन्न”

अलिबाग – आदर्श शैक्षणिक समूहाचे, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नविन पनवेल व बोर्ड ...
रायगड

आम्ही पिरकोनकर’ समूहाकडून सर्वसामान्यांचा प्रवास सुसह्य होण्यास हातभार

पनवेल – गिरीश भोपी सामाजिक कार्यात नेहमीच मोलाची भूमिका बजावणाऱ्या ‘आम्ही पिरकोनकर’ समूहाने पुन्हा एकदा ...
रायगड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार नागोठणे येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

अलिबाग ,जि.रायगड दि.24 :- नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय एज्युकेशन संकुलात उभारलेल्या 100 बेड मर्यादेच्या ...