Home मराठवाडा महंत चंद्रशेखर भारती महाराज यांचे भादली येथे देहावसान…

महंत चंद्रशेखर भारती महाराज यांचे भादली येथे देहावसान…

100

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – पंचदशनाम ,जुना आखाडा चार मढी येथील मठाधिपती महंत चंद्रशेखर भारती-गिरी महाराज यांचे आज शुक्रवारी,२९ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास १२८ व्या वर्षी, गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या श्रीक्षेत्र भादली येथे देहावसान झाले.निरंजनी आखाडा,श्रीक्षेत्र उक्कडगाव संस्थानचे मठाधिपती महंत डॉ. श्रीकृष्णपुरी महाराज यांच्या हस्ते भारती महाराजांना देण्यात आली आहे.कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरात लाॅकडाउन जाहीर करण्यात आलेले आहे.त्यामुळे सोशल डिस्टंसच्या नियमाचे पालन करत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत महाराजांना अखेरचा निरोप देण्यात आला.या प्रसंगी महंत देवेंद्र गिरी महाराज, महंत विवेक भारती महाराज, महंत बालकानंद महाराज, महंत मनमोहन भारती महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.दिवंगत चंद्रशेखर भारती महाराज हे महान तपस्वी होते.जपतप, हिंदू धर्म प्रचारक, मंदिर सेवक म्हणून त्यांचे नाव अग्रस्थानी राहीले.पालकमंत्री राजेशभैया टोपे यांनी बाबाजींच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. बाबाजींनी अन्न , पाण्याशिवाय , लिंबाचा पाला आणि दुध घेऊन अनुष्ठान केले,जुनागड गिरनार पर्वतावर एका पायावर उभं राहून नऊ वर्षे तपश्चर्या केली असल्याचे सांगितले जाते. अलीकडे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र भादली येथे बाबाजी वास्तव्यास होते.