Home नांदेड नांदेड जिल्ह्यात आज मुखेडच्या एका महिला रुग्णाचा मृत्यू तर दिवसभरात ५ रुग्णांची...

नांदेड जिल्ह्यात आज मुखेडच्या एका महिला रुग्णाचा मृत्यू तर दिवसभरात ५ रुग्णांची भर , ९ रुग्णांना मिळाली सुट्टी

121

नांदेड, दि २९ ( राजेश एन भांगे ) नांदेड जिल्ह्यातील शुक्रवार दिनांक 29 मे 2019 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 113 अहवाला पैकी 108 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले व यात नवीन 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे रुग्णसंख्या 143 एवढी झाली आहे तर मुखेड येथील एका महिला रुग्णाचा नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा 8 वर पोहोचला आहे.

शुक्रवार दिनांक 29 मे 2020 रोजी एनआरआय यात्री निवास covid-19 येथील 8 रुग्ण व उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील 1 रुग्ण असे एकूण 9 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 143 पॉझिटिव रुग्णां पैकी 99 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे, उर्वरित 36 रुग्णावर औषधोपचार चालू असून त्यातील 2 स्त्री रुग्ण 52 व 55 असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.

आज सायंकाळी 5 वाजता प्राप्त झालेल्या 5 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी मिल्लत नगर भागातील 1 रुग्ण(स्त्री वय वर्ष -40) 1 रुग्ण लोहार गल्ली भागातील (पुरुष वय वर्ष 38) व कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील 2 रुग्ण ( पुरुष/स्त्री वय वर्ष 38/35) यापैकी 4 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषध उपचार सुरु असून मुखेड येथील एका महिला रुग्णाचा डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे मृत्यू झाला आहे. यासह नांदेड जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा वाढून 8 वर पोहोचला आहे.

गुरुवार दिनांक 28 मे 2020 रोजी पाठवण्यात आलेल्या 128 तपासणी अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील व दिनांक 29 मे 2020 रोजी 101 रुग्णांचे स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील अशी माहिती आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 5 पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ हिंगोली जिल्ह्याच्या 2 रुग्णांचा समावेश.

☑️ एकूण रुग्ण संख्या 143 वर.

☑️ दिवसभरात 9 रुग्णांना सुट्टी.

☑️ आत्तापर्यंत 99 बरे होऊन घरी.

☑️2 पॉसिटीव्ह रुग्ण अजुनही फरार.

☑️8 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️36 रुग्णांवर उपचार सुरू.

☑️ मुंबई येथे 2 दोन रुग्ण उपचारासाठी संदर्भित.

☑️ दोन महिला रुग्णांची प्रकृती चिंताजनक.

दरम्यान जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सदर माहिती दि.२९ मे. रोजी सायं ५ वा. प्राप्त नुसार.