May 29, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती घरीच साजरी करा – दत्ता वाकसे

बीड – ( प्रतिनिधी ) – काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण गोरगरिबांना अनाथालय त्याचबरोबर पशु पक्षासाठी डोंगरदऱ्यांमध्ये पाणवठे उभारून होळकर साम्राज्याच्या लढाव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती यंदा आपल्या घरी राहून साजरी करावी जयंतीदिनी गोरगरिबांना वंचित कामगार कष्टकरी अनाथ यांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप करून जयंती साजरी करावी असे आवाहन धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाची होळकर जयंती घरीच राहून साजरी करावे कोणत्याही स्वरूपात बाहेर मनोरंजनाचे जाहीर कार्यक्रम लावून मिरवणूक काढून गर्दी जमवण्याचा प्रयत्न कोणी करू नये यावर्षी कोरोनाचे जीव घेणे संकट असताना लॉकडाऊनचा नियम पाळणे आवश्यक आहे त्यामुळे यंदा 31 मे रोजी आपण घरीच राहून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करावी असे आव्हान वाकसे यांनी केले आहे यंदा 31 मे रोजी होळकर जयंती दिनी सकाळी नऊ वाजता सर्वांनी आपल्या घरी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावे सोशल डिस्टन्स पाळावे आपल्या घरी साजरी झालेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती चे फोटो सोशल मीडियावर टाकावेत असे आव्हान धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी केले आहे.

गरिबांना मदत करा मुख्यमंत्री निधीत सहभाग द्या…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील अनेक गरीब मदतीपासून वंचित आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे निमित्त साधून गरजूंना अन्नधान्य व इतर स्वरूपातील मदत करावी व समाजातील सक्षम लोकांनी कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करावी असे आवाहनही दत्ता वाकसे यांनी केले आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!