Home उत्तर महाराष्ट्र “पत्रकार संरक्षण समिती” च्या जिल्हा समन्वयकपदी अमर ठोंबरे

“पत्रकार संरक्षण समिती” च्या जिल्हा समन्वयकपदी अमर ठोंबरे

30
0

नाशिक , ( प्रतिनिधी ) – पत्रकार संरक्षण समिती , (महाराष्ट्र) या शासन मान्यताप्राप्त संघटनेच्या नाशिक जिल्हा समन्वयक म्हणून जेष्ठ पत्रकार , स्तंभलेखक प्रा.अमर ठोंबरे यांची निवड ( दि.२२/५/२०२० रोजी ) करण्यात आली. त्यांना नियुक्तीबद्दल निवडपत्र पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या सहीने तसेच तनिष्काचे जिल्हा समनवयक , सामाजिक कार्यकर्ते , संरक्षण समितीचे राज्य संघटक विजयकुमार इंगळे यांचे हस्ते देण्यात आले.
दरम्यान यावेळी पत्रकार संरक्षण समितीच्या ध्येय धोरणानुसार मेहनती, सक्रिय पत्रकारांना सोबत घेऊन कार्य करू , पत्रकारांचे विविध स्थर व त्यांचे प्रश्न घेऊन अधिक व्यापकपणे हक्क अधिकारांसाठी पाठपुरावा करू व प्रसंगी आंदोलने करू, असे नवनियुक्त जिल्हा समन्वयक प्रा. अमर ठोंबरे यांनी सांगितले.
प्रा. ठोंबरे वारकरी सेवा समितीचे संस्थापक आहे तसेच गेल्या अनेक वर्षे पत्रकारिता , अध्यापन , लेखन क्षेत्रात कार्यरत आहे.

Unlimited Reseller Hosting