Home विदर्भ वाघापुर ( टेकडी ) व नारकुंड येथे आदर्श विवाह संपन्न…!

वाघापुर ( टेकडी ) व नारकुंड येथे आदर्श विवाह संपन्न…!

127

स्व.हिराई बहुउद्देशीय सामाजिक संस्था व भारतीय नारी रक्षा संघटना यांचा आदर्श विवाहासाठी पुढाकार.

यवतमाळ – दि.१७ मे रोजी वाघापुर टेकडी येथील रहिवासी असलेले गणेश महादेवराव पोतर यांच्या कन्येचा विवाह कळंब येथील वर मारोतराव ठाकरे यांचा मुलगा विलास सोबत साखरपुढा करुन ठरला होता मात्र सर्वत्र कोरोना विषाणुच्या प्रादृभावाने शासनाच्या वतिने लाॅकडाऊन करण्यात आला असल्याने वधु वराकडील मंडळी विवंचनेत होती कि दिवसेंदिवस लाॅकडाऊन वाढतच आहे तसेच आपण विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका हि वाटप केल्या आता कसे करायचे हा प्रश्न त्यांना सतावत होतो.

या संदर्भात आपल्याला स्व.हिराई बहु.सामाजिक संस्था व भारतीय नारी रक्षा संघटना काही मदत करणार का यासाठी त्यांनी हिराई बहु.सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किशोर नरांजे व भारतीय नारी रक्षा संघटनेचे सुकांत वंजारी यांच्याशी संपर्क केला व सविस्तर माहिती दिली.या प्रकारची दखल घेऊन त्यांनी दोन्ही कडील मंडळींना एकत्रित बसुन आपण प्रशासनाच्या नियामाचे पालन करुन विवाह पार पाडणे शक्य आहे असे सांगितले.या करिता रितसर परवानगी काढुन कमीतकमी पाहुण्यांच्या उपस्थित होणे शक्य असल्याची माहिती दिली.या नंतर दि.१६ मे रोजी नारकुंड येथील दशरथ लोणकर यांचा मुलगा दिलीप दशरथ लोणकर यांचा विवाह कळंब तालुक्यातील थाळेगाव येथील मधुकर देवनाळे यांची मुलगी वैशाली मधुकर देवनाळे हिच्याशी विवाह सोहळा संपन्न झाला तसेच दि.१७ रोजी वाघापूर टेकडी येथील गणेश महादेव पोटर यांची मुलगी कु.दिपाली गणेश पोटर हिचा विवाह कळंब ता.कळंब जि.यवतमाळ येथील मारोतराव ठाकरे यांचा मुलगा विलास मारोतराव ठाकरे यांच्याशी संपन्न झाला आहे आणि दि.१७ मे रोजी नारकुंड येथील दशरथ लोणकर यांची मुलगी गिरजा दशरथ लोणकर हिचा विवाह गोरी ता.बाभुळगाव जि.यवतमाळ येथील बुधाजी गोळे यांचा मुलगा पुरूषोत्तम बुधाजी गोळे यांच्याशी विवाह सोहळा संपन्न झाला परंतु हे तिन्ही विवाह तिनं महिन्या आधी यांचा साखर पुडा संपन्न झाला होता परंतु संपूर्ण देशात कोवीड १९ मुळे लाॅकडाऊन देशात लागले व लग्न कार्यात अडचणी निर्माण झाल्या व वर व वधु मंडळींच्या पुढे प्रश्न निर्माण झाले व धावपळ सुरू झाली आणि दि.५ मे रोजी स्व.हिराई बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था वाघापूर टेकडी येथील संस्थेचे अध्यक्ष किशोर नरांजे व भारतीय नारी रक्षा संघटनेचे सुकांत वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आपण रितसर परवानगी घेवून तुमच्या मुला,मुलीचा विवाह सोहळा साजरा अगदी वेळेनुसार कायद्याची अंमलबजावणी करून विवाह सोहळा संपन्न करू शकतो आणि प्रयत्नाने सर्व काही सुरळीत झाले,विशेष म्हणजे किशोर नरांजे व सुकांत वंजारी यांनी केलेल्या सहकार्यामुळे शासन निर्णयाचे पालन करुन व वधु/वरा कडील १०-१० पाहुण्यांच्या समक्ष विवाह सोहळा साजरा केला तसेच लग्न विधी कर्ते रविन्द्र दोड,गणेश महादेव पोटर,सुनंदा पोटर विजय वाघमारे,दत्ता नेवासे,कुंडलीक चावरे , केशवराव ठाकरे,रेणुका ठाकरे,शोभा गजबे, रामराव सोनवणे,रमेश पोटर,सुमित्रा पोटर,सुरेखा नेवारे,आदी उपस्थित होते.