Home सोलापुर लॉकडाउन च्या काळात बालपणातील खेळाना उजाळा

लॉकडाउन च्या काळात बालपणातील खेळाना उजाळा

225

वागदरी / नागप्पा आष्टगी

अक्कलकोट – कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढल्यामुळे देशात लॉकडाउन आहे. घरात बसुन कंटाळा येत असल्यामुळे अबाल, वृध्द स्त्री पुरूष लहानपणातील लोकप्रिय खेळाना उजाळा देत असुन, खेळाचे मनमुराद आनंद घेत आहेत.
गेल्या ५० दिवसापासुन कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासनाने तीन वेळा लॉकडाउन वाढविले तरी पण कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव कमी होताना दिसुन येत नाही. त्यामुळे नागरिक घरीबसुन वैतागुन गेले आहेत. घरात बसुन वेळ जात नाही. बाहेर आल्यावर पोलिसांचा प्रसाद खावा लागतो, गप्पा मारण्यासाठी मित्र बाहेर भेटत नाही अशी स्थिती ग्रामीण भागात आहे. त्यामुळे रिकामा वेळ कसे काढावा यासाठी विविध उपाय योजना आखत आहेत. काही चित्र काढण्यात, गाणे म्हणत, नक्कल करत तर काही बौध्दिक खेळ खेळ दिसुन येत आहे. बहुतेक ग्रामीण भागात लहानपणीचे खेळ बिन खर्चाचे व भरपूर वेळ मारून येणारे पारंपरिक खेळ खेळाना दिसुन येत आहे.
वाघ शेळी हा खेळ पूर्वी लोकप्रिय खेळ होता मेंदुला चालना देणारा खेळ म्हणुन पाहयचा बिन खर्चाचा बारीक बारीक आठ दगड त्यात एक वाघ उर्वरित शेळी. थोडक्यात आजचा चेस खेळ होय. तरी पण सर्व सोयी उपलब्ध असताना देखील ग्रामीण नागरिक लॉकडाउन काळात दगडाचा खेळाला पसंदी देताना दिसुन येत आहे. त्याच प्रमाणे काडी उचलणे हा पण बौध्दिक खेळच आहे. परंतु डिजीटल युगात हा खेळ कालबाह्य झाला होता. आता लॉकडाउन काळात लोकप्रिय खेळ बनला आहे. कच्चा कचोरा, चिंचोका खेळ हे सर्व खेळ पंचाविना खेळणारे खेळ आहेत, घरात सर्व कुंटुबिय एकत्र बसुन आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं, चोर पोलिस असे खेळ खेळताना बालपणात हरवुन जात आहेत. काही महिला काचा कवड्याना जास्त पंसदी देत आहेत. त्यामुळे दिवस कधी मावळला कळतच नसेल.