Home विदर्भ Bacchu Kadu: ”सत्ता गेली चुलीत; आमच्या वाटेला आले तर कोथळा काढल्याशिवाय राहणार...

Bacchu Kadu: ”सत्ता गेली चुलीत; आमच्या वाटेला आले तर कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही”.

121

 

मनिष गुडधे.

आज अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा होत आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादासंदर्भात बच्चू कडू आज त्यांची भुमिका मांडत आहेत. कडू नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मेळावा सुरू झाल्यानंतर बोलताना बच्चू कडू म्हणाले की सत्ता चुलीत गेली. प्रहार काही अंडु पांडू नाही. वार करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आमच्या वाटेला आले तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. 350 गुन्हे घेऊन अंगावर घेऊन फिरतोय असं म्हणत त्यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली आहे.पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ही पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो. पुढच्या वेळी माफी मिळणार नाही. पुन्हा आमच्या वाटेला गेल्यास माफी मिळणार नाही. आम्ही विचारांचा झेंडा हाती घेतला आहे. आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही आणि आमच्या वाट्याला गेलं तर आम्ही सोडत नाही. मी राजकारणासाठी कोणाचा वापर केला नाही. जली को आग कहते है, बुझी को राख कहते हैं असंही कडू म्हणालेत.मी उगाच गुवाहाटीला गेलो नाही. निर्णय कडू असले तरी चालेल पण काम गोड करता आलं पाहिजे.जे बंडखोर आहेत तेच पहिल्या पंक्तीत आहे.पहिली वेळ होती म्हणून माफ करतो पण दुसऱ्या वेळी वाटेला गेले तर प्रहरचा वार कसा असतो ते आम्ही सांगू तुम्हाला असंही कडू मेळाव्यात बोलताना म्हणालेत.बच्चू कडू बोलताना म्हणाले की, राणांबरोबरचा विषय संपला आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून आम्हाला बदनाम केलं जात आहे. आम्ही गुवाहाटीला का गेलो? माझ्याकडे मंत्रिपद होतं. मंत्रिपद सोडून कोण जातं का? पण जिथे तत्त्व येतं तिथे काही निर्णय घ्यावे लागतात, असं बच्चू कडू मेळाव्यावेळी बोलताना म्हणालेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही काँग्रेसला जळतं घर म्हटलं होतं. पण जेव्हा वंचितांना न्याय द्यायची वेळ आली तेव्हा ते काँग्रेससोबत सत्तेत गेले. गोरगरीबांसाठी काही निर्णय घ्यावे लागतात, असं कडू यावेळी म्हणालेत.