Home जळगाव भुसावळातील रेल्वे कुलींना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

भुसावळातील रेल्वे कुलींना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

67
0

प्रतिनिधी लियाकत शाह

भुसावळ – रेल्वे स्थानकावर हमाली करुन उपजिविका चालविणाऱ्या कुली बांधवांना लॉकडाऊनमुळे उपाशीपोटी राहण्याची वेळ आल्याने भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे कुली लोकांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता आणि वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार वाणिज्य विभागातर्फे भुसावळ पार्सल कार्यालयात भुसावळ रेल्वे स्थानकावरील गरजू अशा ५१ कुलींना वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी व अन्य मान्यवरांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू, राशन सामान वाटप करण्यात आला.