Home महत्वाची बातमी इंसानियत अभि जिंदा है ???? अन्न त्यांच्या चेहेऱ्यावर हसू खिळला...

इंसानियत अभि जिंदा है ???? अन्न त्यांच्या चेहेऱ्यावर हसू खिळला , सर्वधर्मीय गरीब भटक्या भुकेलयांना गेल्या दोन दिवसा पासून दाऊद सेठ कुरेशी यांनी केले अन्न धान्य वितरण ,

159

अमीन शाह ,

इथे जाती पातीला थारा नाही इथे फक्त माणुसकी जिवंत आहे याचा संदेश आज शाळा वयस्थापन समिती चे अध्यक्ष समाजिक कार्यकर्ते दाउद सेठ कुरेशी यांनी सर्वधर्मियांना अन्न धान्य वितरण करून माणुसकी चा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश साखरखेर्डा वासीयांना दिला आहे , एकी कडे काही काही सुशिक्षित लोक करोना वायरस च्या भीती मुळे गरिबांना दूर लोटत आहे तर दुसरीकडे काही दानशूर लोक गरिबांना मदत करून त्यांच्या पोटाची खळगी भरत आहे करोना वायरस च्या भीती मूळे लोकडाऊन सुरू असून गरीब शेतमजूर रोज कमावणारे लोक घरात असल्या मुळे त्यांच्या कुटुंबियांवर अन्न धान्य नसल्या मूळे उपासमारीची पाळी आली आहे ही बाब हेरून येथील उर्दू शाळा वयस्थापन समिती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते दाऊद सेठ कुरेशी , मा , उप सरपंच अय्युब सेठ कुरेशी यांनी गेल्या दोन दिवसा पासून अनेक गरिबांना अन्न धान्य वितरण करून भुकेल्या पोटांची खळगी भरण्याची सोय झाल्या मूळे अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान हसू दिसत होते , गेल्या दोन दिवसात कुरेशी परिवाराच्या वतीने किराणा अन्न धान्य वाटप करण्यात आल्या मूळे अनेक गरीब भटके शेत मजूर लोकांत आनंद वयकत केला जात आहे ,