Home रायगड कोरोनापासून सुरक्षिततेसाठी भिसेगाव युवा मंडळातर्फे परिसरात औषध फवारणी…!

कोरोनापासून सुरक्षिततेसाठी भिसेगाव युवा मंडळातर्फे परिसरात औषध फवारणी…!

118
0

कर्जत – जयेश जाधव

कर्जत नगर परिषदेकडे औषध फवारणी करण्यासाठी कमी मनुष्यबळ असल्याने प्रत्येक प्रभागातील परिसरात जाऊन कोरोना विषाणू संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी औषध फवारणी करू शकत नसल्याने ” तुम्हीच तुमचे रक्षक ” या शासनाच्या घोष वाक्यानुसार भिसेगाव युवा मंडळाने स्वयंस्फूर्तीने खर्च करून ग्रामस्थांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी जंतुनाशक औषध फवारणी संपूर्ण भिसेगाव परिसरात केली .
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशव्यापी प्रयत्न चालू आहेत . यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामी लागली असताना कर्जत नगर परिषद देखील याबाबतीत नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी सरसावली आहे . मात्र कमी मनुष्यबळ असल्याने औषध फवारणीसाठी वेळ कमी पडत आहे . कोरोना विषाणू संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी परिसरात औषध फवारणी होणे हि गरजेचे असल्याने ” तुम्हीच तुमचे रक्षक ” या शासनाच्या घोष वाक्यानुसार भिसेगाव युवा मंडळातील कार्यकर्त्यांनी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भिसेगाव परिसरात स्वयंस्फूर्तीने व स्वखर्चांने इमारतीच्या सोसायटीत , गल्ली – बोळात , रस्त्यांवर , गटार , नाल्यात , सार्वजनिक शौचालयात , चौकात , आदी भागात जंतुनाशक औषध फवारणी केली तसेच इमारतीच्या सोसायटी कमिटीला जंतुनाशक औषध देऊन ते सोसायटी परिसरात मारण्यास सांगितले . भिसेगाव परिसरात जंतुनाशक फवारणी करून कोरोना विषाणू संसर्ग होण्यासाठी पूरक वातावरण रहाणार नाही , व नागरिकांची सुरक्षा होईल , या उदात्त हेतूने भिसेगाव युवा मंडळाने हि जंतुनाशक फवारणी केली असल्याचे नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी सांगितले .

Unlimited Reseller Hosting