Home विदर्भ संचार बंदीत अडकलेल्यांकरीता यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपाययोजना

संचार बंदीत अडकलेल्यांकरीता यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपाययोजना

111
0

खालील मोबाईल क्रमांकावर साधता येईल संपर्क

यवतमाळ, दि.27 : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोकण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही उपाययोजना करीत असताना अनेकांना याची झळ पोहचत आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्याकरीता ही झळ सर्वांना काही काळ सोसावी लागणार आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळातील अडचणीतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहे. यात बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना परत येण्यासाठी तसेच मूळ गावी परत जाणा-या नागरिकांना संपर्क साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

संचारबंदीमुळे यवतमाळ शहरात अडकलेल्या विद्यार्थी, नागरिकांना यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी परत जायचे असेल त्यांनी मोबाईल क्रमांक 9422166532, 9552010660, 9922875461, 9421773332 आणि 9175113713 या क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव, सध्या राहत असलेला पत्ता व कोणत्या गावाला परत जायचे आहे, याबाबत तात्काळ माहिती द्यावी. ज्यांना यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुक्यातून यवतमाळला यायचे आहे किंवा यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुक्यात जायचे आहे, अशा तालुकास्तरावर अडकलेल्या नागरिकांकरीता संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत ही उपाययोजना राबविण्यात येत आहे. तेथील नागरिकांनी संबंधित तहसीलदारमार्फत करण्यात येणा-या आवाहनानुसार संबंधितांकडे माहिती द्यावी. यवतमाळ जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातील वा बाहेर राज्यातील लोक अडकून पडले आहेत, अशा लोकांना राहण्याची अडचण असल्यास त्यांनीसुध्दा 9422166532, 9552010660, 9922875461, 9421773332 आणि 9175113713 या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याबाबत यवतमाळ येथील सामाजिक संघटनांच्यावतीने त्यांची व्यवस्था करता येईल.

संचारबंदीमुळे भोजणाची आवश्यकता असणा-या यवतमाळ शहरातील नागरिकांनी 9403545223, 9421837372, 7057379282, 9850050209 आणि 8668812651 या क्रमांकावर संपर्क साधून नाव व सध्या राहत असलेला पत्ता कळवावा. काही गरजवंतांकडे दूरध्वनी नसेल अशांनी आजुबाजूच्या नागरिकांनी मदत घेऊन आपली माहिती उपलब्ध करून द्यावी. तालुकास्तरीय व ग्रामीण भागातील नागरिकांकरीता संबंधित तहसीलदार यांच्यामार्फत ही उपाययोजना करण्यात येईल.तेथील नागरिकांनी संबंधित तहसीलदारांमार्फत करण्यात येणा-या आवाहनानुसार संबंधितांकडे माहिती द्यावी.

संचारबंदीमुळे ब-याच नागरिकांना रोजगारावर जाता येत नाही. अशा काही नागरिकांच्या भोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संकटावर मात करण्यासाठी गरजवंताच्या भोजन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर उपाययोजना करण्याकरीता जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात कार्यरत असणा-या सामाजिक संघटना यांनी त्यांच्या संस्थेमार्फत काय सहकार्य करता येईल, याबाबत संबंधित संस्थेने त्यांचे पदाधिकारी / स्वयंसेवकांच्या यादीसह निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या rdc_yavatmal@rediffmail.com या मेल आयडीवर किंवा 9860614405, 9420550435, 9823970209, 9923226373 आणि 9921873266 या क्रमांकावर त्वरीत लेखी कळवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी कळविले आहे.