Home जळगाव कोरोना संदर्भात आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची तातडीची बैठक

कोरोना संदर्भात आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची तातडीची बैठक

169

निखिल मोर

पाचोरा – शहरात कोरोना प्रतिबंध आणि जनजागृती संदर्भात आमदार किशोर पाटील यांनी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचेसह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि भविष्य काळात राबवल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांची माहिती करून घेत महत्त्वपूर्ण सूचना देखील दिल्या.
यावेळी विविध विभागांची जबाबदारी पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली असून तालुका आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र,खाजगी डॉक्टरांना यांनी असे पेशंट आढळल्यास आपल्याकडे माहिती व सिव्हिल रुग्णालय जळगाव येथे नमुना तपासणीसाठी पाठवणे बाबत सूचना द्याव्या यासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती व स्वच्छतेबाबत फवारणी व इतर उपाय करणे आपल्याकडे यासंबंधी आवश्यक औषधे व उपकरणे उपलब्ध करून घेणे तसेच पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पाचोरा भडगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन यांचेसह सर्व पोलिस पाटलांना बाहेर राज्यातून देशातून पुणे व मुंबईहून येणाऱ्या नागरिकांची नोंद घेऊन त्यांचे आरोग्य तपासणी झाल्याची खात्री करून घेणे व मुसाफिर रजिस्टरला नोंद घेणे परदेशातून येणाऱ्या नागरिकांची गोपनीय माहिती मिळवणे व त्यांची कोरोना टेस्ट सिव्हिल हॉस्पिटल जळगाव घेऊन किंवा उपलब्ध सोयीच्या ठिकाणावरून करून घेणे जर निगेटिव असेल तर पंधरा दिवस होऊन 149 नोटीस देणे व पॉझिटिव्ह असल्यास त्याचे इस्पितळात बाबत नोटीस देणे तसेच लग्न धार्मिक मनोरंजन व इतर ठिकाणं नोटीस देऊन गर्दी होऊ न देणे तर नगरपालिका मुख्याधिकारी पाचोरा भडगाव शहरी भागासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती पाचोरा भडगाव ग्रामीण भागासाठी आठवडे बाजार मॉल,३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याबाबत रिक्षा फिरवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पर्यंत बंद ठेवण्याबाबत रिक्षा फिरवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची प्रसिद्धी करणे स्‍वच्‍छ फवारणी बाबत काळजी घेणे व आवश्यक उपाययोजना करणे, अस्वच्छ दुकानदार गर्दीच्या रस्त्यालगत अतिक्रमण अतिक्रमण करून असलेल्या टपऱ्या व दुकाने याबाबत आवश्यक कार्यवाही करणे व प्रसंगी पोलिस बंदोबस्त घेणे वॉर्डनिहाय स्वच्छता व फवारणी कार्यक्रम,जनजागृती बाबत रिक्षा फिरवणे,दवंडी देणे व स्वच्छतेबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी औषध विक्रेत्यांची औषध व इतर साहित्याची साठेबाजी होणार नाही याबाबत त्यांना सूचना देणे यासारखे अनेक उपक्रम युद्धपातळीवर राबवण्याचे या बैठकीत निश्‍चित करण्यात आलेले आहे.
यावेळी आमदार किशोर पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे , तहसीलदार कैलास चावडे,विभागीय पोलिस अधिकारी ईशवर कतकडे , पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, भडगाव पोलीस निरीक्षक धंनजय येरुळे , नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर , आरोग्यअधिकारी समाधान वाघ, डॉ.अमित साळुंखे, मेडिकल ऑफिसर डॉ सुनिल गावित, डॉ प्रिया देवरे, डॉ भूषण मगर, डेपोमेनेजर वाणी यांचेसह सर्व अधिकारी उपस्थित होते.