Home महत्वाची बातमी बोर्डीचे पोलिस पाटील यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी सुरु आहे खटाटोप…..

बोर्डीचे पोलिस पाटील यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी सुरु आहे खटाटोप…..

91
0

पोलिस पाटील व ट्रक्टर मालक यांनी केले संगणमत…..

अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे अवैध रेति चोरीचा ट्रक्टर नायब तहसीलदार व तलाठी यांनी दि.9/3/2020 रोजी रात्री 12.30 वाजता दुर्गा माता चौक बोर्डी येथे पकडून स्पॉटवरच पंचनामा करून ग्रामीण पोलिस स्टेशन येथे जागा नसल्या कारणामुळे बोर्डीचे पोलिस पाटील प्रकाश उगले यांच्या ताब्यात दिला होता.पोलिस पाटील व ट्रक्टर मालक यांचे जवळचे सबंध असल्यामुळे पोलीस पाटील यांनी ट्रक्टर मालकावर कारवाई होण्याच्या आधिच ताब्यात असलेला रेतीचा ट्रक्टर परसस्पर सोडुन दिला होता.या बाबत दि.11/3/2020 ला पोलीस पाटील यांच्या विरोधात उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांचेकडे लेखी तक्रार दाखल दिली होती.त्याच तक्रार वरुन त्याच दिवशी नायब तहसीलदार गुरव यांनी तलाठी यांना बोर्डीला पाठवुन पोलिस पाटील यांच्या ताब्यात जप्त करुन दिलेला रेतीचा ट्रक्टर त्यांच्या घराजवळ आहे किवा नाही या बाबत पंचनामा करण्याचे आदेश दिले होते.तरी तलाठी खामकर यांनी दि.11/3/2020 रोजी बोर्डीला येवुन पोलिस पाटील यांच्या घराजवळ पोलिस पाटील यांच्या ताब्यात दिलेला रेतिचा ट्रक्टर आढळुन आला नाही असा स्वताहा चार लोकांच्या सह्यानीशी व तक्रारदार यांच्या समक्ष पंचनामा केला होता व पोलिस पाटील यांना या बाबत विचारले असता पोलिस पाटील यांनी सांगितले होते की ट्रक्टर घेऊन गेल्याचे सांगितले होते.तलाठी यांनी अहवाल नायब तहसीलदार यांचेकडे सादर केला होता व तलाठी यांच्या अहवाला वरुन नायब तहसीलदार गुरव यांनी पोलिस पाटील यांंनि सदर रेतीचा ट्रक्टर परसस्पर सोडुन दिला व कर्तव्यात कसून केल्याचे दिसते.या बाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या करीता दि.12/3/2020 रोजी उपविभागिय अधिकारी अकोट यांचेकडे प्रस्ताव सुध्दा पाठविला होता.त्या प्रस्तावा वरुन उपवीभागिय अधिकारी अकोट यांनी पोलिस पाटील यांना कारणे दाखवा नोटीस सुध्दा बजावली आहे.व तिन दिवसात स्पष्टिकरण मागवीले होते. ट्रक्टर मालका कडून दि.13/3/2020 ला दंड सुध्दा वसुल केला आहे.असे असतांना पोलिस पाटील व ट्रक्टर मालक यांनी पुन्हा संगणमत करून पोलिस पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी दि.17/3/2020 ला ट्रक्टर पोलीस पाटील यांच्या शेतात नेवुन उभा केला व नायब तहसीलदार यांना पुन्हा पंचनामा करने करीता दबाव आणला आहे.तरी नायब तहसीलदार यांनी तलाठी खामकर यांना पुन्हा आदेश देवून तिसरा पंचनामा करण्याचे सांगितल्या वरुन दि.18/3/2020 ला तलाठी यांनी तिसरा पंचनामा केला व ट्रक्टर पोलिस पाटील यांच्या शेतात उभा आहे.असा पंचनामा करुन तिसरा अहवाल सुध्दा दाखल करण्यात आला.दि.9/3/2020 ते दि.17/3/2020 परंत रेतिचा ट्रक्टर पोलिस पाटील यांचेकडे दिसून आलेला नसल्यावर तो नेमका कुठे आहे याची शहानिशा करने अपेक्षीत होते.व ट्रक्टर पुन्हा जप्त करुन नायब तहसीलदार व तलाठी यांनी पोलिस स्टेशनला लावने गरजेचे होते.मात्र नायब तहसीलदार व तलाठी यांनी तसे केले नाही.प्रकरण अंगलट येणार म्हणून ट्रक्टर मालका कडून दि.13 /3/2020 लाच दंड वसुल केलेला आहे.पोलिस पाटील यांनी त्यांच्या ताब्यात असलेला रेतीचा ट्रक्टर स्वताच्या शेतात नेवुन उभा केलेला असता तर दि.11/3/2020 ला जो त्यांच्या घरासमोर पुन्हा पंचनामा झाला त्याच वेळेस ही माहीती दिली असती व ट्रक्टर शेतात उभा केला आहे हे स्वताहा दाखवले असते.

हा सर्व प्रकार पोलिस पाटील व ट्रक्टर मालक यांनी संगनमत करुन फक्त पोलिस पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ नये या करीता केलेला आहे.या बाबत काल तक्रारदार यांनी पुन्हा जिल्हाधिकारी , पालकमंत्री , उपविभागीय अधिकारी,नायब तहसीलदार यांचेकडे लेखी तक्रार करून प्रकारणाची योग्य ती चौकशी करून पोलिस पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.तरी आता उपविभागीय अधिकारी अकोट हे काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.