मराठवाडा

देगलूर तालुक्यात मोटार सायकल व ऑटोच्या अपघातात एकजन जागीच ठार

Advertisements

नांदेड , दि.२० – ( राजेश भांगे ) –

खानापूरकडे जाणाऱ्या ऑटोला चोंडी तालुका मुखेड येथून देगलुर कडे येणाऱ्या मोटरसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात ऑटोतील एक महिला जागीच ठार झाली तर मोटरसायकल स्वारांसह इतर चार प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर फाट्यावर बुधवार (दि १८) रोजी सायंकाळी घडली.
ऑटो क्रमांक एम. एच. २६-१४५ मधून देगलूर हुन गावाकडे जाण्यासाठी काही प्रवाशी प्रवास करीत होते मोटरसायकल क्रमांक एम. एच.२६ ८४७२ यावर शेख युसुफ इस्‍माईल चोंडी तालुका मुखेड वय २२ हा देगलूर कडे जात होता खानापूर फाट्यावर या दोन वाहनाची धडक होऊन लक्ष्मीबाई भुजंगराव सावरगावे राहणार अल्लापुर वय ५० ही जागीच ठार झाली तर रसूल, मारुती अकडेमोड वय ४५ राहणार तडखेल मारुती उमला राठोड वय ७५ रा. तडखेल तांडा, मारुती निवृत्ती वाघमारे शंकर नगर वय ३० वर्ष चंदरबाई शंकर बिजलिकर वय ५० रा.अल्लापुर हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून काही गंभीर जखमींना नांदेडला हलविण्यात येत असल्याची रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून महिन्याभरातील खानापूर फाट्यावर ही तिसरी घटना होय. गंभीर जखमींना उपचार करण्यासाठी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष महेश पाटील हणमंत देशमुख अल्लापुरकर यांनी मदत केली.

You may also like

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...
मराठवाडा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करा – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना – मागील पंधरवड्यात तालुक्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील ...