Home जळगाव ७७ व्या दिवशी धरणे आंदोलन सुरच* *प्रशासन व मानवता यांना सन्मान देऊन...

७७ व्या दिवशी धरणे आंदोलन सुरच* *प्रशासन व मानवता यांना सन्मान देऊन उपोषण स्थळी संख्येवर नियंत्रण*

361

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या उपोषणाचा गुरुवार हा ७७ वा दिवस या दिवशी जळगाव शहर जिल्ह्यातील विशिष्ट अशा प्रतिनिधींची उपस्थिति होती.
आंदोलनाची सुरुवात युसुफ शेख रुस्तम यांनी पवित्र कुराण पठण करून केली व सांगता अब्दुल गफ्फार मलिक यांच्या दुवा ने करण्यात आली
*पोलीस -प्रशासन व आंदोलका मधे चर्चा*
प्रशासनाचे साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या सूचना, महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ४३ आदेश ,पोलीस निरीक्षक जिल्हा पेठ यांचे पत्र क्रमांक ८०७ दिनांक १७ मार्च फेब्रुवारी २० चे आदेश यानुसार पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला असता मुस्लिम मंच चे समन्वयक फारुक शेख यांनी पोलिस प्रसाशन यांना समजवीले परंतु ते समजू शकत नसल्याने फारूक शेख व मुफ़्ती अतिकउर रहमान यांनी त्वरित जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकने यांची भेट घेऊन त्यांना आपले म्हणणे सांगितले त्याचप्रमाणे प्रशासन व मानवता हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही स्वतःहून आमच्या आंदोलकांच्या संख्येवर अंकुश आणला असून उद्यापासून फक्त पाच ते दहा लोक आंदोलन करतील परंतु कोणत्याही परिस्थितीत संविधान बचाव साठी आम्ही लोकशाही मार्गाने आमचे आंदोलन सुरूच ठेवू असे त्यांनी जिल्हादंडाधिकारी यांना विनवणी पूर्व सांगितले असता माननीय डॉ अविनाश ढाकने दंडाधिकारी यांनी त्यास सहमती दर्शवली यावेळी चर्चेत जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल हे उपस्थित होते.

यावेळी डॉक्टर अमानुल्ला शाह, कदीर खान ,अन्वर सिकलिगर,फारूक अहलेकार, रागिब जहागीरदार , सय्यद शाहिद,रुबीना शेख इक्बाल, शर्मिन सय्यद हरीश, डॉक्टर जबी शाह, मेहमूद मोगल यांची उपस्थिती होती.

*आन्दोलकांना विनंती* जिल्हादंडाधिकारी डॉ ढाकने यांच्याशी चर्चा करून परत आल्यावर फारुक शेख यांनी उपस्थित आंदोलकांना माहिती विशद केली. प्रशासन व मानवता हे दृष्टिकोन समोर ठेवून आंदोलक फक्त ५ पुरुष अथवा महिलांचा समावेश असेल जोपर्यंत हा कोरोना व्हायरस पूर्णपणे थांबणार नाही तोपर्यंत आपण प्रशासनास सहकार्य करू.

*आंदोलनस्थळी यांची होती उपस्थिती*
प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, गफ्फार मलिक, करीम सालार, मुफ़्ती हारून नदवी, अमीन बादलीवाला, समीना बी हरीश, संजीला शेख इक्बाल, नजमा शेख हुसेन, सकीना शेख इस्माईल, रुबिना इक्बाल, मेहराज शेख रशीद , सायमा शेख इस्माईल, सय्यद साजदा बी शेख जफर ,इक्रा शेख , शेख आरिफ शेख तहमीना, शेख मेहराज, शेख रुबीना ,शेख इक्बाल ,अब्दुल हमीद शेख, शहबाज खान, गुलाम दस्तगीर, सलीम शेख, डॉक्टर इक्बाल शाह, नजमा बी, शेख अमिन, शेख फातिमा, शेख सुलताना, शेख सबनूर, शेख सलीम, सय्यद मुनज़्ज़ा, सय्यद शाहिस्ता, सय्यद हाजरा बी, आलीना शेख, तय्यब शेख, जाकिर खाटीक, खान इम्रान ,शेख मोहम्मद, उमर मोहसिन ,सय्यद जहारा ,नसीम बानो, सानिया बी,मारिया सय्यद, सिद्धिका सय्यद ,सुलताना बी, नाजिया एजाज, रेहाना सय्यद, सय्यद अबुबकर ,मुक्तार अली, अब्दुल हकीम शेख, शफीक शेख, अर्षद शेख ,अबुजर शेख आदींची उपस्थिती होती.
*निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन*

विजया पाटील यांच्या नेतृत्वात सचिन धांडे, आवेश रंगरेज, अजिज शिकलीगर ,अन्वर सिकलीगर ,आरिफ पठाण, वसीम शेख यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास कदम यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या सादर केल्या.