महत्वाची बातमी

क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांची १८७ वी जयंती साजरी

Advertisements

पारंपारिक पद्धतीने भव्य मिरवणुक ठरली आकर्ष

कोरपना तालुका – मनोज गोरे

गडचांदूर येथे क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांची१८७ वी जयंती आदिवासी बांधवानी मोठ्या उत्साहात साजरी केली.
यात गाववाशी व आदिवासी बांधवानी मोठ्या संख्येनी सहभाग घेतला. विर बाबुराव शेडमाके चौक येथे त्यांच्या प्रतिमेस नगर परिषदेचे नगराध्यक्षा सौ सविता टेकाम यांनी पुष्पहार अर्पण करुन भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत बाल सांस्कृतिक कार्यक्रमांनी यात्रा अधिकच आकर्षक दिसत होती. पारंपारिक पद्धतीने आदिवासी बांधवानी आणि बालकलाकारांनी आदिवासी समाजाच्या वेशभूषेत नृत्य व संगीत सादर करून आदिवासी संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले. घुसारी आणि डफरे यांच्या तालावर आदिवासी बांधव गोंडी गाण्यात नृत्य करण्यात दंग झाली.

जय सेवा जय बिरसा च्या घोषणाने संपूर्ण गडचांदूर नगरी दुमदुमली होती.
बालकलाकारांनी बिरसा मुंडा आणि बा. शेडमाके यांच्या वेशभूषेत रूप धारन करुन त्यांच्या जीवन वास्तविकतेचे आणि त्यांच्या कार्याचे दर्शन लोकांना अनुभवता आले.
बिरसा मुंडा आणि वीर बाबुराव शेडमाके यांनी केलेले महान कार्य हे आदिवासीं बांधवांसाठी अभिमान व कौतुकास्पद आहे. इतिहासकारांनी त्यांनी केलेले संघर्ष आणि महान कार्य इतिहासात अक्षररूपी जतन करुन ठेवली आहे. त्यांच्या या महान कार्या मुळे आणि संघर्षा मुळे आदिवासी बांधव बाबुराव शेडमाके यांना भगवान मानुन त्यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करतात आणि भव्य शोभायात्रा दरवर्षीच काढत असतात.
विर बापु शेडमाके चौक येथुन मिरवणुकीला सुरुवात होऊन पुढे संविधान चौक ते गांधी चौक, ज्योतिबा फूले चौक ते विर बापु शेडमाके चौक पर्यंत पोलिस प्रशासनाच्या कड़क बंदोबस्तात ही शोभायात्रा काढण्यात आली.

You may also like

कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा संपन्न

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा येथे मागील वर्षा पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी समाजसेवेचे कार्य करण्याकरीता ...
महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...