Home महत्वाची बातमी अल्पवयीन मुलावर इसमाकडून लैंगिक अत्याचार , “फाशीच्या शिक्षेची मागणी”

अल्पवयीन मुलावर इसमाकडून लैंगिक अत्याचार , “फाशीच्या शिक्षेची मागणी”

44
0

गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार निमणी येथील घटना…!

कोरपना – तालुक्यातील निमणी येथे इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर एका इसमाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना आज दि. १५ ला सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली.
महादेव उत्तम गोंडे (२८) रा. निमणी असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात पीडित मुलाने व त्याच्या परिवाराने तक्रार दाखल केली आहे.पीडित मुलगा ११ वर्ष व त्याचा मित्र वय १५ हे दोघेही गावाजवळील शेतात बकऱ्या राखत असताना आरोपीने तुम्हाला हरभरा देतो म्हणून स्वतःच्या शेताकडे मोटारसायकल वर बसवून घेऊन गेला व रानजीच्या झाडाखाली मोटारसायकल ठेवली व त्यांना त्यांना कपडे काढायला सांगितले असता तिथून दोघांनीही पळ काढला व आरोपी त्या दोघांच्या मागे धावू लागला व पीडित मुलगा वय ११ वर्ष यांना पकडून त्यांना खांद्यावर उचलून शेतात घेऊन गेला व त्याचे पाय शेतातील वेलांनी बांधून त्याला मारझोड करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला त्यामध्ये पीडित विद्यार्थी जखमी झाला असुन त्यांनी व त्याच्या मित्रांनी ही माहिती आपल्या आईला दिली असून आईने व मुलांनी गडचांदूर पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलीस ठाणेदार गोपाल भारती यांनी शहानिशा करून आरोपींविरुद्ध कलम ३७७ आय पी सी ४/८/१० (३,२,५) पोक्सो अ‍ॅट्रास‌िटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंद करून अटक केली आरोपीला सोमवारला न्यायालयात हजर केले असता ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Unlimited Reseller Hosting