Home मराठवाडा कोणत्याही बालकास पहिले सहा महीने फक्त आईचेच दूध खाद्य पेय म्हणून आवश्यक...

कोणत्याही बालकास पहिले सहा महीने फक्त आईचेच दूध खाद्य पेय म्हणून आवश्यक असते

244

रावेर (शरीफ शेख)

 तालुक्याती खिर्डी येथे दि ६ रोजी येथील अंगणवाडी खिर्डी बुद्रुक व अंगणवाडी खिर्डी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमानाने पोषण पकवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन रावेर प.स रावेर चे सभापती जितेंद्र पाटील यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रावेर प.स.सदस्य दिपक पाटील,खिर्डी बुद्रुक लोकनियुक्त सरपंच किरण कोळी हे होते.

कोणत्याही बालकास पहिले सहा महीने फक्त आईचेच दूध खाद्य पेय म्हणून आवश्यक असते.ह्या काळात त्यास कोणतेही इतर अन्न,पाणी सुद्धा लागत नाही.बालकांसाठी सर्वोत्तम अन्न म्हणजे आईचे दूध असते असे या प्रसंगी रावेर बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रशांत मिटकारी बोलत होते.

कार्यक्रमात गर्भधारक महिलांना पोषक आहाराबाबत माहिती देण्यात आली.तसेच डिलेव्हरी झालेल्या महिलांना बेबी किट  वाटप करण्यात आले.

या वेळी एल.ए.पाटील,श्रीमती तयाडे,एल.ए.पावले,खिर्डी बुद्रुक पोलिस पाटील अरुण पाटील,ग्राम पंचायत सदस्य गंभीर पाती,पंकज राणे,योगेश जाधव,किरण नेमाडे,उमेश तयाडे,माधुरी नेमाडे,उषा तयाडे,अशा पाटील,वैशाली पातील,शमीम बी,फरजांना बी,खिर्डी खुर्द व खिर्डी बुद्रुक सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद भदाने यांनी केले.