Home महत्वाची बातमी बोर्डी येथिल तलाठी यांनी पकडलेल्या रेतिच्या ट्रक्टरचे प्रकरण गुलदस्त्यात,

बोर्डी येथिल तलाठी यांनी पकडलेल्या रेतिच्या ट्रक्टरचे प्रकरण गुलदस्त्यात,

29
0

बोर्डीचे पोलिस पाटील उगले यांच्यावर निलंबनाची कारवाईची केली मागणी.

देवानंद खिरकर

बोर्डी= अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथेगेल्या कित्येक दिवसांपासुन घोगानाल्या मधुन अवैध रेतीची चोरी सुरु आहे.या बाबत वेळोवेळी बातम्या सुध्दा प्रकाशित झाल्या याचीच दखल घेत बोर्डीचे तलाठी यांनी दि.9/3/2020 रोजी सायंकाळी 12.30 वाजता बोर्डीचे तलाठी खामकर यांनी शिवपुर येथिल मनिष अनिल बोंद्रे यांचा बिना रायल्टि असलेला अवैध रेतिचा ट्रक्टर दुर्गा माता चौक बोर्डी येथे पकडला.व या बाबत नायब तहसीलदार गुरव यांना सुध्धा माहीती दिली होती.व पकडलेल्या रेतिच्या ट्रक्टरचा पंचनामा केला होता.त्यावर ट्रक्टर मालक,तलाठी,बोर्डीचे पोलिस पाटील उगले यांच्या सह्या आहेत.व तो रेतीचा ट्रक्टर पोलिस पाटील उगले यांच्या ताब्यात देण्यात आला होता.वास्तविक पाहता पोलिस पाटील व तलाठी यांनी सदर ट्रक्टर हा पोलिस स्टेशनला लावने अपेक्षीत होते.परंतु ट्रक्टर मालक व पोलिस पाटील यांचे सबंध मधुर असल्यामुळे पोलिस पाटील यांनी तो ट्रक्टर सोडुन दिला व ट्रक्टर मनिष बोंद्रे यांच्या ताब्यात वापस दिला आहे.व आज तिन दिवसापासुन सुध्धा या ट्रक्टर मालक किवा पोलिस पाटील उगले यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.शासनाचे प्रतिनिधी असलेले बोर्डीचे पोलिस पाटील प्रकाष उगले यांनी या आधी सुध्दा एका प्रकरणात बोर्डीतील 4 ब्रास जप्त असलेली रेती पोलिस पाटील उगले यांच्या सुपूर्दनाम्यावर सोडन्यात आली होती.ती रेती सुध्दा त्या मालकांनि 63332 रुपये दंड न भरताच स्पॉटवरुन चोरुन सुध्दा नेली आहे.तरी सुध्दा त्या प्रकरणात पोलिस पाटील यांनी तहसीलदार अकोट यांना आज परंत सुध्दा कुठलीही माहीती दिलेली नाही.ती रेती सुध्दा स्पॉटवरुन चोरी जाण्यास पोलिस पाटील हेच जाबबदार आहेत.असे असतांना सुध्धा पोलिस पाटील उगले यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.ही उल्लेखनिय बाब आहे.तरी पोलिस पाटील हे शासनाचे प्रतिनिधि असल्यावर सुध्दा त्यांनी वेळोवेळी पदाचा दुरपयोग केला आहे. करीता दोन्ही प्रकरणात जबाबदार असलेले बोर्ड़ीचे पोलिस पाटील प्रकाष उगले यांच्यावर फौजदारी किवा निलंबनाची कारवाई करण्यात यावी.अशी मागणी तक्रारदार यांनी उपविभागिय अधिकारी व तहसिल अकोट यांचेकडे केली आहे.या बाबत वरिस्ठ अधिकारी काय कारवाई करतात या कडे लक्ष लागले आहे.

बोर्डी येथे दि.9/3/2020 रोजी सायंकाळी 12.30 वाजता शिवपुर येथिल मनिष बोंद्रे यांचा रेतीचा ट्रक्टर पकडला व पंचनामा करुण बोर्डीचे पोलिस पाटील उगले यांच्या ताब्यात दिला होता.
खामकर तलाठी बोर्डी.
बोर्डी येथिल पकडलेला रेतिचा ट्रक्टर पोलिस पाटील उगले यांच्या ताब्यात देण्यात आला असतांना त्यांनी सोडुन दिल्या बद्द्ल त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव पाठवुन त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल.
गुरव नायब तहसीलदार अकोट.

Unlimited Reseller Hosting