Home सोलापुर शेतकऱ्यांनी दृष्टीकोन बदलल्यास उत्पादन वाढ शक्य

शेतकऱ्यांनी दृष्टीकोन बदलल्यास उत्पादन वाढ शक्य

111

कुरनूर येथे ऊस शेतीवर परिसंवाद व चर्चासत्र

प्रतिनिधी सतीश मनगुळे

अक्कलकोट, दि. ११ :- शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीत बदल करणे आवश्यक आहे विज्ञान आधारित दृष्टीकोन शेतकऱ्यांनी ठेवल्यास शेती उत्पन्नात वाढ होऊ शकते.
भाव वाढविणे आपल्या हातात नाही पण उत्पन्न वाढविणे नक्की आपल्या हातात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या परिवर्तनाची आवश्यकता आहे,असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे भूमिअभिलेख विभागाचे आयुक्त ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.इंडियन पोटॅश लिमिटेड,मुंबई,सेवा संस्था कुरनूर आणि ज्ञानसागर सहकारी मच्छीमार
संस्था यांच्यातर्फे कुरनूर (ता.अक्कलकोट ) येथे ऊस शेतीवर परिसंवाद आणि
चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. धर्मेन्द्रकुमार फाळके,
आयपीएलचे सिनियर रिजनल मॅनेजर सयाजीराव पाटील, बारामतीचे शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,कनिष्ठ विक्री अधिकारी एस.डी. चव्हाण उपस्थित
होते.यावेळी बोलताना फाळके
म्हणाले,ऊस शेतीला खूप मोठा इतिहास आहे शेजारच्या शेतकऱ्यांकडे पाहून ऊस
शेती करणे शेतकऱ्यांनी बंद केले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्याने माती परीक्षण,खोल पूर्व मशागत, सेंद्रिय खत, शुद्ध बियाणे,
ऊस लागवड, खताचा योग्य प्रमाणात वापर, वेळेवर तोडणी, तणनियंत्रण,
किडींचा प्रादुर्भाव यासारख्या
बाबींकडे लक्ष दिल्यास एकरी उत्पादनात वाढ होऊ शकते त्यासाठी पाडेगाव येथील शेतीचा आदर्श घ्यावा. कष्टापासून बचाव करण्याची पद्धत शेतकऱ्यांनी बंद
केले पाहिजे.यात माती परीक्षण हादेखील मुद्दा
महत्वाचा आहे. मातीचे आरोग्य सुधारण्यास उत्पादन वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आयपीएल कंपनीचे मॅनेजर सयाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक करताना कुरनूरचे माजी सरपंच अमर पाटील यांनी ऊस परिसंवाद आणि चर्चासत्र घेण्यामागचा उद्देश सांगितला.कुरनूर
धरण परिसरात उसाचे क्षेत्र
मोठे आहे पण म्हणावे
तसे उत्पादन उसाला नाही त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि एकरी उत्पादन वाढावे यासाठी हा परिसंवाद घेतला असल्याचे पाटील
यांनी सांगितले.प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्याम सुरवसे, राजू बिराजदार, बाबासाहेब मोरे, अण्णासाहेब सुरवसे, परशुराम बेडगे, रामचंद्र शिंगटे, गोविंद देवते, सिद्धू जगताप यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कुरनूरचे सुपुत्र ज्ञानेश्वर पाटील यांची मध्यप्रदेशच्या भूमिअभिलेख आयुक्तपदी बढती मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.