Home पश्चिम महाराष्ट्र त्याने आपल्या जन्मदात्या आई बाप बहिणीस मारून टाकले

त्याने आपल्या जन्मदात्या आई बाप बहिणीस मारून टाकले

56
0

सकाळी घडला खुनी थरार

अमीन शाह

सांगली , दि. ११ :- आज सकाळी जत तालुक्यातील उमदी या गावी खुनी थरार घडला असून एका मुलाने बापाच्या जमिनीसाठी आपल्या जन्मदात्या आई , बाप , बहिणीस मारून टाकल्याची घटना घडली आहे घडलेल्या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार जत पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या उमदी येथील गुरुलिंग अप्पा आरेकरी हे आपल्या कुटुंबा सह राहत होते घरात पत्नी नागवा अप्पा , मुलगी समुद्रा बिरादार , मुलगा सिध्धा अप्पा , यांच्या सह राहत होते त्यांच्या कडे काही जमीन होती त्या जमिनी वरून मुलगा सिध्धा अप्पा नेहमी बापा सोबत वाद करीत होता आज सकाळी ही त्याने आपल्या बापा सोबत जोरदार भांडण केले व हातात कुऱ्हाडी घेऊन आपल्या आई , बाबा , व बहेनिस स्पा सप वार करून मारून टाकले मिळालेल्या माहिती नुसार खुनी मुलगा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे , पुढील तपास पोलीस करीत आहे.