Home विदर्भ वर्धा येथील बंद दुकानांना टार्गेट करून मुद्देमाल चोरून नेणाऱ्या आंतरराजीय टोळीतील तीन दरोडेखोरांना...

वर्धा येथील बंद दुकानांना टार्गेट करून मुद्देमाल चोरून नेणाऱ्या आंतरराजीय टोळीतील तीन दरोडेखोरांना अटक

54
0

स्थानिक गुन्हे शाखे ची कामगिरी…!!

अमीन शाह

वर्धा , दि. ११ :- कुलूपबंद दुकानांना टार्गेट करून मुद्देमाल चोरून नेणाऱ्या आंतरराजीय टोळीतील तीन सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्यप्रदेशातील इंदुर भागातील बजरंगपुरा पारधी बेड्यावरून ताब्यात घेत अटक केली दहा दिवस होते पोलीस मुक्कामी, डॉक्टरांच्या चिट्ठीवरून . या टोळीतील सदस्य शहराबाहेर आपला डेरा टाकून रेकी करून चोरी करायचं असं पोलिसांच्या तपासात पुढे आलं.
चोरट्याची टोळी ही मध्यप्रदेशातील इंदुर येथील असली तरी या टोळीतील सदस्यांनी गुजरात, नंदुरबार, धुळे, चाळीसगाव असा प्रवास करीत वर्धा गाठली. त्यानंतर शहरा शेजारी त्यांनी आपला डेरा टाकून मार्केटची रेकी केली. शिवाय मुख्य बाजारपेठेतील दोन दुकानांना टार्गेट करून तेथून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला.
पकडण्यात आलेल्या आरोपीत अपालसिंग सोलंकी, धरमसिंग सोलंकी, नागरसाहेब गुज्जर यांचा समावेश आहे. यांनी सराफा व्यावसायिकांचे दोन प्रतिष्ठान तोडून लाखोंचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. दरम्यान, सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासून इंदूर गाठले. त्यानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला दहा दिवस इंदूर परिसरात मुक्काम ठोकावा लागला. मात्र, या पोलिसांनी दवाखान्यात दिल्या जाणाऱ्या चिट्ठीवरून माग काढून आरोपीला ताब्यात घेतलं पोलिसांच्या या कामगिरी ची प्रशनसा केली जात आहे .