Home मराठवाडा अट्टल घरफोडी करणारा चोरटा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

अट्टल घरफोडी करणारा चोरटा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

39
0

गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरी

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ११ :- हर्सूल कारागृहातून जामिनावर सुटका होताच दुसऱ्या दिवशी घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्या सूर्यकांत ऊर्फ सनी गोपीनाथ जाधव (रा. क्रांतीनगर) याला गुन्हे शाखा पोलिसांनी गजाआड केले. सूर्यकांत उर्फ सनी जाधव याच्या ताब्यातून पोलिसांनी 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 3 तोळे वजनाचे मंगळसूत्र जप्त केले आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे, सहाय्यक फौजदार शेख नजीर, जमादार चंद्रकांत गवळी, सुधाकर राठोड, सुधाकर मिसाळ, आनंद वाहुळ, रवींद्र खरात आदींच्या पथकाने केली.

Unlimited Reseller Hosting