Home पश्चिम महाराष्ट्र विभागीय माहिती कार्यालयाच्या नुतनीकरण कामाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते उद्घाटन

विभागीय माहिती कार्यालयाच्या नुतनीकरण कामाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते उद्घाटन

42
0

राजेश भांगे

पुणे , दि. १० :- नूतनीकरण करण्यात आलेल्या विभागीय माहिती कार्यालयाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक तसेच प्रसिद्ध कवी व गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा माहिती कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. नुतनीकरण करण्यात आलेल्या विभागीय माहिती कार्यालयाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन राज्यातील सर्व माहिती कार्यालये या पध्दतीने सुशोभित होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून प्रशासकीय पातळीवर निश्चितच मदत करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. पांढरपट्टे यांनी दिले.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर , संचालक सुरेश वांदिले , संचालक शिवाजी मानकर , उपसंचालक मोहन राठोड , पुणे, सोलापूर व सातारा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग , रवींद्र राऊत , युवराज पाटील, वृषाली पाटील, गणेश फुंदे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting