जळगाव

सामूहिक वनाधिकार प्रशिक्षण शिबीर संपन्न

Advertisements

रावेर (शरीफ शेख)

रावेर येथे वनांचल समृद्धी अभियान आयोजित सामुहिक वनाधिकार प्रशिक्षण शिबीर, रावेर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित,व्ही.एस.नाईक महाविद्यालय येथे संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ.पी. व्ही.दलाल यांच्या हस्ते भारत माता व स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पुजनाने झाले.प्रास्ताविक वसाचे जिल्हा समन्वयक शुभम नेवे यांनी केले. ग्रामविकासाचे माॅडेल असलेल्या बारीपाडा गावावर आधारित चित्रफित सर्वांना दाखवली.तसेच प्राचार्यांनी मनोगत व्यक्त केले व जंगल संवर्धन व संरक्षण करणे ही काळाची गरज असुन वाढत्या ग्लोबल वार्मिंग ला आळा घालण्यासाठी कीती महत्त्वाचे आहे व वसा त्यासाठी प्रयत्नरत आहे तसेच सर्वांनी वसा संस्थेची या कामात मदत घ्यावी असे आपले मत व्यक्त केले.
जिल्हा समन्वयक शुभम नेवे यांनी वनहक्क कायदा मांडणी केली.
आपल्या तालुक्यातील आदिवासी बांधवांना त्यांच्या दैनंदिन गरजा व आजच्या आधुनिक युगातील विकासाच्या वाटेवरचा वाटसरू करण्यासाठी वनांचल समृद्धी अभियान (वसा) या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून कामकाज सुरु आहे.मनरेगा या योजनेच्या माध्यमातून संस्थेने जनसंपर्क अभियान राबवून रोजगाराच्या शोधात असलेल्या बांधवांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच त्या विषयी मनरेगा प्रशिक्षण शिबीर घेऊन वेगवेगळ्या गावांमध्ये जनजागृती केली. पुढील टप्प्यात आम्ही सामुहिक वनहक्क प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जेणेकरुन या प्रशिक्षण शिबीरांच्या माध्यमातून ज्या आदिवासी गावांना सामुहिक वनहक्क प्राप्त झाला आहे त्यांना त्या जंगलाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रवृत्त करीत व त्यातील गौण वनउपज च्या माध्यमातून त्यांचा उपजिविकेचा प्रश्नही सुटेल असा प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन प्रा.सी.पी.गाढे यांनी केले.
प्रशिक्षण शिबीराला जवळपास २५ गावांमधून आदिवासी बांधव व वनसंवर्धन विषयात आवड असणारे विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते.याप्रसंगी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृह गृहपाल लता घाटे यांनीही उपस्थिती दिली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.व्ही.डी.पाटील व नबी तडवी यांनी परीश्रम घेतले.

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...