जळगाव

साधना विद्यालयत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

Advertisements

प्रतिनिधी लियाकत शाह

जळगाव , दि. २० :- कासोदा ता एरंडोल सकाळी ठीक ८.३० वाजता साधना माध्यमिक उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण विद्यालय कासोदा येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक नानासाहेब श्री.जी.के. सावंत होते तर लोकनियुक्त सरपंच श्री दादासाहेब उमेश श्रीराम पाटील व विद्यालयाचे स्कूल कमेटी सदस्य श्री.प्रशांत श्रीराम पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जिवनकार्याबद्दल भाषण, पोवाडे, पाळणा, नाटीका द्वारे आपले विचार व्यक्त केले. शिवाजी महाराजांची वेशभूषा विद्यार्थी दिनेश पाटील याने शिवरायांच्या कार्याबद्दल दिलेल्या भाषणाने व मुलींच्या लेझीम संचलनाने गावांतील पालकांना पमंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक श्री.जे.डी. साळुंखे सरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती एम एस पवार यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती स्वाती ढोले यांनी केले. कार्यक्रमास गावातील व परीसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-बघिनींनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...