Home मराठवाडा शिव जयंती मिरवणूकीत एकाची भोसकून हत्या….

शिव जयंती मिरवणूकीत एकाची भोसकून हत्या….

132

नाचण्या वरून झाला वाद

अब्दुल कय्युम / अमीन शाह

औरंगाबाद , दि. 20 :- राज्यात आणि देशात शिवजयंती बुधवारी उत्साहात साजरी झाली. ठिकठिकाणी मिरवणुका आणि शोभायात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. औरंगाबद शहरातही शिवजयंतीची मिरवणूक उत्साहात झाली. दरवर्षी ही मिरवणूक सगळ्यांचं आकर्षण असतं. मात्र काल झालेल्या मिरवणुकीला गालबोट लागल्याचं पुढे आलंय. मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांचं आपसात भांडण झालं आणि त्यात एका तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली.
हत्या झालेल्या तरुणाचं नावं श्रीकांत गोपीचंद शिंदे असं आहे. श्रीकांत हा मिरवणुकीत सहभागी झाला होता. मिरवणूक शांतपणे पुढे जात असतानाच त्याचं आणि इतर काही तरुणांचं भांडण झालं. त्यानंतर सर्व जण पुन्हा मिरवणुकीत सहभागी झाले. श्रीकांत हा नाचत असतानाच भांडण झालेले तरुण पुन्हा त्याच्या जवळ आले. त्यातल्या एकाने आपल्या जवळच्या चाकूने त्याच्या छातीमध्ये वार केले.
हिंगणघाट जळीत प्रकणातल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न?
या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला. हल्ल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले. लोकांनी श्रीकांतला हॉस्पिटलमध्ये नेलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं तयार केली असून ते त्यांचा शोध घेत आहेत