उत्तर महाराष्ट्र

पतीचे नको ते व्हिडिओ पत्नीने पाहिले, त्याने पत्नीला पेटवूनच दिले…!!

Advertisements

अमीन शाह

अहमदनगर , दि. १३ :- पतीने आपल्या पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये उघडकीस आला आहे. पत्नीने आपल्या अनैतिक संबंधांचे व्हिडिओ पाहिल्याने संतापाच्या भरात पतीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नीला पेटवल्यानंतर या नराधम पतीने घरातून पळ काढला आहे. तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हिंगणघाट येथील जळीतकांडाचं प्रकरण ताजं असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

अहमदनगरमधील नेवासे तालुक्यातील मोरेचिंचोरा येथे ही घटना घडली आहे. शंकर दुर्गे असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीचे एका दुसऱ्या महिलेसोबत अनेक संबंध होते. या महिलेसोबतच्या अनैतिक संबंधांचे व्हिडिओ त्याने बनवले होते. तसेच दोघांचे फोटोही त्याने काढले होते. मात्र ते फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यास तो विसरला. नेमके पतीचा फोन पत्नीच्या हाती लागल्.वर तिने फोटो आणि व्हिडिओ पाहिले. हे सर्व पाहून पत्नीने त्याला जाब विचारला असता शंकर घाबरून बिथरला. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झाले. तेव्हा पत्नीने ही बाब सर्वांना सांगणार असल्याची धमकी त्याला दिली. आपले बिंग नातेवाईक तसेच शेजाऱ्यांसमोर फुटेल या भीतीने संतापाच्या भरात त्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले आणि तिथून पसार झाला.

पत्नीला पेटवून दिल्यानंतर शंकरने लागलेच घरातून पळ काढला. शेजाऱ्यांच्या मदतीने या पीडित महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सोनई पोलीस स्टेशनमध्ये शंकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

You may also like

उत्तर महाराष्ट्र

मधुकर होन यांची राष्ट्रीय वारकरी परीषदेच्या चांदेकसारे शाखा अध्यक्षपदी निवड !!

कोपरगाव प्रतिनिधी  अहमदनगर – तालुक्यातील चांदेकसारे येथील मधुकर होन यांची राष्ट्रीय वारकरी परीषदेच्याश्री राम रतन ...
उत्तर महाराष्ट्र

राम लिलेची रंगभूषेचा पिढीजात वारसा जपतोय – रंगभूषाकार नाना जाधव

अयोध्या राममंदिर निर्माण विशेष नाशिक :- गेल्या ५० वर्षे आमच्या कुटुंबाने गांधीनगर येथील रामलिलेच्या पात्रांची ...
उत्तर महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये नाशिकच्या “स्ट्रेंजर्स” (strangers) महितीपटास प्रथम पुरस्कार जाहीर

नाशिक – निर्माता दिग्दर्शक लेखक विशाल पाटील या युवा फिल्ममेकर्सने निर्मिलेल्या “स्ट्रेंजर्स” (strangers) या सामाजिक ...
उत्तर महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्त्यांचे मदतीतून निराधाराना अन्नधान्य किराणा वाटप

नाशिक , दि. ०१ :- कोरोनाच्या काळात गाव,खेडे,पाडे येथील निराधार कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून ...