Home विदर्भ देवळीत बंद पाळून निघाला आक्रोश मोर्चा.!

देवळीत बंद पाळून निघाला आक्रोश मोर्चा.!

79
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

सर्व समावेशक नागरीक मोर्चात सामील.

वर्धा , दि. ०६ :- जिल्ह्यातील देवळी शहरातील सर्व राजकीय संघटना, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, महाविद्यालयीन युवा संघटना आणि शाळा-विद्यालयीन विद्यार्थी व महिलांच्या वतीने आज दिनांक ०६ फेब्रुवारी २०२० ला तात्काळ बंदची हाक देण्यात आली व मोर्चा तहसीलदार कार्यालयात येवून निवेदन देण्यात आले.

देवळी शहरातील बाजार लाईन चे सर्व दुकाने सकाळपासून बंद करण्यात आले. नागरिकांच्या सर्व सामाजिक व राजकीय आणि महाविद्यालयीन संघटनांनी तहसीलदार यांच्या कार्यलयावर मोर्चा काढला व हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला पेट्रोल नी जाळून टाकल्याच्या घटनेचा जाहीर निषेध व आक्रोश व्यक्त करीत घोषणाबाजी केली. विद्यार्थी व मोर्चेकर यांनी justice for Ankita, we want justice असे नारे देत आपला जनआक्रोश व्यक्त केला. या वेळी तहसिल कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने मोर्चेकर सहभागी झाले होते, देवळी तहसीलदार राजेशजी सरोदे यांना जाहीर मोर्चाचे निवेदन देण्यात आले. देशात घडणाऱ्या घटना निर्भया, प्रियंका रेड्डी आणि हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता यांच्या सारख्यावर केलेल्या अमानुष हल्याच्या व बलात्कारातील गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, त्यांच्या गुन्हेगाराची केस फास्टट्रक कोर्ट मध्ये व्हावी आणि २२ दिवसाग आरोपीला फाशीची शिक्षा करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी जाहीर पणे मोर्चे करांची तहसीलदार यांनी केली. यावेळी राजकीय, सामाजिक व विद्यालयीन मोर्चेकरांनी आपापले मत व्यक्त केले त तहसीलदार सरोदे यांनी ही या दुःखद घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या आक्रोश मोर्चाचे निवेदन शासनास त्वरित कार्यवाहीसाठी सादर करण्याचे आश्वासन दिले. आक्रोश मोर्चाचे आयोजन नगर परिषद अध्यक्ष देवळी सुचिताताई मडावी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.